
मुंबई – निलेश मोरे
आज देशभर सुरू असलेल्या भारत बंद ला महाविकास आघाडीने पाठिंबा देत आज निदर्शने करण्यात येत आहे. उपनगरात मुलुंड , भांडुप , विक्रोळी , घाटकोपर , कुर्लामध्ये बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. आज ठिकठिकाणी कार्यकर्त्यानी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. घाटकोपरमध्ये सर्वोदय सिग्नल या मुख्य रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यानी एलबीएस मार्गवर ‘रास्ता रोको’ करण्याचा प्रयत्न केला.
ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष केतन शहा यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यानी फलक बाजी करत केंद्र सरकार विरोधात नारेबाजी केली. तर एलबीएस मार्ग बंद करण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस आणि कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली. काही मिनिटांसाठी रास्ता करण्यात आला. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आनंद शुक्ला , ब्रिजेश शर्मा , जावेद आमीन आदी उपस्थित होते.