
मुंबई : निलेश मोरे
केंद्र सरकारने पारित केलेल्या कायद्याला देशभरातून शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आज शेतकऱ्यांनी देशभरात पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी , काँग्रेसकडून आज देशभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू असताना शिवसेनेनेही आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.
घाटकोपरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक अश्विनी दिपक हांडे , नगरसेवक सुरेश पाटील , परमेश्वर कदम , स्नेहल मोरे आदींनी आज सकाळ पासून आपल्या प्रभागातील दुकाने बंद ठेवत शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काल रात्रीपासूनच शिवसेनेचे कार्यकर्ते बंद मध्ये सहभाग घेत दुकानदाराना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केल्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपक हांडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
घाटकोपरमध्ये भटवाडी , गोळीबार रोड , एलबीएस रोड , जगडूशा नगर , असल्फा , अमृतनगर आदी विभागात शिवसेनेकडून कडकडीत बंद पाळण्यात आला.