नवी मुंबई : उद्यान विभागातील निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेवून त्यांना कामावर रुजू करून विभागीय चौकशी करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील १) चंद्रकांत डी. तायडे, सहाय्यक आयुक्त २) भालचंद्र रामचंद्र गवळी, प्रभारी सहाय्यक उद्यान अधिकारी ३) प्रकाश पांडुरंग गिरी, प्रभारी उद्यान अध्यक्ष (परिमंडळ_१) यांचे विरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यासंदर्भात महानगरपालिकेने सदरील अधिकारी कर्मचारी यांचे विरुद्ध दोषारोपपत्र निर्गमित केलेली असून संदर्भ क्रमांक (१) ते (३) च्या आदेशान्वये संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे.
चंद्रकांत तायडे, सहाय्यक आयुक्त हे महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारित) अधिनियमातील कलम ४५ नुसार संविधानिक (statuary post) वर कार्यरत आहेत. महाले उपायुक्त हे सुद्धा संविधानिक पदावर काम करत असून उपरोक्त नमूद केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर त्यांचे थेट पर्यवेक्षण असून श्री महाले यांचीसुद्धा विभाग प्रमुख म्हणून सदरील भ्रष्टाचारात चौकशी करणे क्रमप्राप्त आहेत, परंतु प्रशासन विभागाने त्यांच्या सोयीनुसार कलम ४५ मधील तरतुदीचा सोयीस्कर अर्थ लावून राज्य शासनाच्या सेवेतील प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी यांची नियुक्ती महानगरपालिका करत नसल्यामुळे त्यांना उपरोक्त भ्रष्टाचार प्रकरणात त्यांचा समावेश न करण्याकरिता त्यांना निलंबित केलेले नाही. वास्तविक पाहता विभाग प्रमुख यांच्या आधिपत्याखाली सदरील कामाच्या नसती आहेत व अशा वेळेस महाले आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या बचावाकरिता पुरावे नष्ट करणे किंवा त्यात फेरफार करण्याची दाट शक्यता आहे, म्हणून राज्य शासनाच्या सेवेतील प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी सुद्धा मुक्ता अधिनियमाच्या कलम ४५ खाली प्रतिनियुक्तीवर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी असून त्यांच्यावर पर्यवेक्षण करण्याचे अधिकार माननीय आयुक्त व प्रशासकांना असल्याचे नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
४) तरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सावत्रपणाची वागणूक देणे करिता सदरचे षड्यंत्र केलेले आहे म्हणून या पत्राद्वारे कायद्यापुढे सर्व अधिकारी कर्मचारी समान असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम ५६ नुसार निलंबित करून त्यांची सुद्धा विभागीय चौकशी करण्यात यावी अन्यथा महानगरपालिकेच्या सेवेतील वर नमूद केलेले उद्यान विभागातील अधिकारी यांना कामावर रुजू करून त्यांची विभागीय चौकशी करावी. उद्यान विभागातील या घडामोडीची सखोल चौकशी होवून सर्वच दोषींना शिक्षा करावी, कोणा र्निदोषावर कारवाई होवून त्यात नाहक भरडला जावू नये अशी मागणी या पत्राद्वारे आपल्याकडे करण्यात येत आहे. याबाबत आकसापोटी कारवाई झाल्यास व बड्या धेंडाना अभय मिळाल्यास नाईलाजास्तव प्रशासनाच्या भूमिकेविरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिला आहे.