मुंबई : व्होल्व्हो आयशर अर्थातच ‘व्हीईसीव्ही’ ने आपला नवीन अत्याधुनिक ट्रक उत्पादन प्रकल्प कार्यान्वित केला असूूून या प्रकल्पाचे व्यावसायिक स्वरुपात कामकाज सुरु झाली असल्याची माहिती व्हीईसीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद अग्रवाल यांनी दिली. मध्य प्रदेश येथील भोपाळच्या बागरोडा येथे हा प्रकल्प असून हा 8 वा उत्पादन प्रकल्प आहे तसेच या उत्पादन प्रकल्पाला 4.0 हे मानांकन प्राप्त झाले आहे. या नवीन प्रकल्पामुळे महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश या भागाच्या विकासासाठी तसेच स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत.
व्हीईसीव्हीने या प्रकल्पात एकूण 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या व्यतिरिक्त या ट्रक उत्पादनात आवश्यक भाग पुरविण्यासाठी 100 हून अधिक सहाय्यक आणि इतर पुरवठादार जुळलेले आहेत अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.
व्यावसायिक वाहतुकीचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने, अत्याधुनिक मशीन्ससह जागतिक स्तरीय उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पात 40 हजार ट्रक तयार करण्याची क्षमता असणार आहे.