मुंबई : निलेश मोरे
भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मुंबईत रावसाहेब दानवे यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेला शाई फासण्यात आली. सद्या देशभरात शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन छेडले असून दिल्ली मध्ये सर्व सीमा जाम झाले आहेत. अशात भाजपचे केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलन संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले त्यांनी शेतकरी आंदोलनाला चिनी आणि पाकिस्तानी सहकार्य असल्याचे वक्तव्य जाहीर सभेतून केले आहे दानवे यांच्या या वक्तव्याचा आता देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.
शेतकऱ्यांना शत्रू राष्ट्रासी जोडल्याने सर्वत्र निषेध केला जात आहे. चेंबूर काँग्रेस स्लॅम सेलचे अध्यक्ष निलेश नानचे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विभागात रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला शाई फासून चप्पल मारण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘रावसाहेब दानवे हाय हाय , रावसाहेब दानवे मुडदा बाद, मोदी सरकार हाय हाय’च्या घोषणा करण्यात आली.यावेळी प्रतिक्रिया देताना निलेश नानचे म्हणाले की केंद्र सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही. अन्नदाता म्हणून ओळखला जाणारा शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहे मात्र शेतकऱ्यांना न्याय द्यायचे सोडून त्यांच्या आंदोलना मागे चिनी व पाकिस्तानचा हात असल्याचे रावसाहेब दानवे वादग्रस्त वक्तव्य करतात. हा संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा अपमान आहे. शेतकरी भाजपा सरकारला माफ केल्याशिवाय गप्प राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.