
नवी मुंबई : प्रभाग क्रं ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६अ आणि सेक्टर १८च्या रहीवाशांकरिता आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून सोमवारी, (दि. २१ डिसेंबर) मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रहीवाशी व ग्रामस्थांच्या प्रतिसादाने हे शिबिर उत्साहात पार पडले.
हे शिबिर आयोजनासाठी प्रभाग ९६च्या स्थानिक नगरसेविका सौ. रूपालीताई किस्मत भगत व जनसेवक गणेश भगत यांच्या पुढाकारातून सहकार्याने हे आरोग्य शिबिर पार पडले. नेरूळ सेक्टर सोळा येथील नगरसेविका सौ. रूपालीताई किस्मत भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कोरोनाचे सावट अजूनही काही प्रमाणात असताना कोरोना महामारीच्या धक्यातून अजून रहीवाशी बाहेर निघालेले नसतानाही सोमवारी आरोग्य शिबिरात रहीवाशांनी सहभागी होत स्वत:ची आरोग्य तपासणी करून घेतली. या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्यासाठी रहीवाशांनी सहभागी व्हावे आणि स्वत:च्या प्रकृतीबाबत माहिती करून घ्यावी यासाठी प्रभाग ९६च्या नगरसेविका सौ. रूपालीताई किस्मत भगत व गणेश भगत यांनी स्वत: रहीवाशांशी संपर्क साधून आरोग्य शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या शिबिराला स्थानिक रहीवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देताना स्वत:ची आरोग्य तपासणी करून घेतली.
हे आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी शिबिराचे आयोजक गणेश भगत,राजु तिकोणे, रमेश नरवडे, अनंत कदम, प्रमोद प्रभु, चंद्रकांत महाजन, मधुसदन पाड़ावे, प्रकाश मतकर, अंकुश माने, रमेश नार्वेकर, पांडुरंग बेलापुरकर, अशोक गांडाल, बाजीराव धुमाळ, सागर मोहिते, अशोक गांडाल, रविंद्र भगत यांनी परिश्रम घेतले.