
संदीप खांडगेपाटील : ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील कचऱ्याचे ढिगारे तात्काळ हटविण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून सोमवारी (दि. २१ डिसेंबर) केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये भुखंड क्रमांक २५२ वर सदगुरू कृप्पा ही इमारत आहे. या इमारतीच्या बाजूलाच भुखंड क्रमांक २५०, २५४ आहे. या भुखंडावर गेल्या अनेक महिन्यापासून कचऱ्याचे ढिगारे पडले आहे. यामुळे परिसराला बकालपणा आला आहे. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे डासाचा उद्रेक वाढीस लागला आहे. यामुळे रहीवाशांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. शिवाय तेथील रहीवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. वारंवार कचऱ्याचे ढिगारे हटविण्यास सांगूनही महापालिका प्रशासन दखल घेत नाही. महापालिका प्र्रशासनाकडून नवी मुंबई शहराला देशात प्रथम क्रमाकांवर आणण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहात. कालच आम्ही पालिका उद्यान व क्रिडांगणात स्वच्छता अभियान राबविले. संबंधितांना हे कचऱ्याचे ढिगारे हटविण्याचे आदेश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.