
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर; संत साहित्य संमेलनाचा सांगता समारंभ
पंढरपूर : हिंदुत्वाचा भगवा नेहण्याच काम संतांनी केले आहे. त्यांची परंपरा जतन करण्याचे काम महाराज मंडळी करत आहेत. अशा साहित्य संमेलनातून हिंदुत्व समजून सांगण्याचा प्रयत्न होतात. परंतु दुसरीकडे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वसामान्यांचा सहभाग असावा. अशा प्रकारची भूमिका घेतल्यावर सुद्धा वर्गणी कशासाठी अशा प्रकारचे वक्तव्य येतात तेव्हा मनाला वेदना होत असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले.
जुहू (मुंबई) येथे वारकरी साहित्य परिषदेचे घेण्यात आलेल्या नववे संत साहित्य संमेलनाच्या सांगता समारंभ प्रवीण दरेकर बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, स्वागताध्यक्ष पंढरपूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश ह.भ.प. चकोर महाराज बाविस्कर, ह भ प माधव महाराज शिवणीकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे, किर्तीपाल सर्वगोड, तेजस कांबळे उपस्थीत होते.
पुढे दरेकर म्हणाले, माझा ही संत साहित्याचा अभ्यास आहे. मी देखील प्रवचन व कीर्तन करून समाज प्रबोधनाचे काम करू शकतो. प्रवचनाचे काही बोल राजकारणात वापरले जात असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. रामदास आठवले यांनी संत परंपरेचा वारसा चालवण्यासाठी आवश्यक ती मदत करू असे आश्वासन दिले. यावेळी आभार प्रदर्शन ह.भ.प. रामकृष्ण लहवितकर यांनी केले.
* असे ठराव मंजूर
फडकरी बांधवासाठी संतपीठ निर्माण करावे. फडकरी बांधवांना मासिक मानधन मिळावे. भीमा, इंद्रायणी व निरा या नदीचे पात्र प्रदूषण मुक्त करावे. आळंदी येथे वारकरी व फडकरी यांच्या जमिनीचे आरक्षण रद्द करावे. संत साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून कायम स्वरुपी आनुदान मिळावे. असे ठराव संत साहित्य संमेलना दरम्यान मंजूर करण्यात आले.