• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 23, 2020

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेसची जय्यत तयारी

adminbyadmin
in Uncategorized
0
सर्वच राज्यात कॉंग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग असताना महाराष्ट्रातच आऊटगोईंग कशी?

मुंबई : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. तीन पक्षाचे हे सरकार कोरोना संकटावर मात करत आता स्थिरस्थावर झाले आहे.  आगामी वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे. सरकारची वर्षभरातील दमदार वाटचाल व पदवीधर, शिक्षक निवडणुकीत मिळालेला दणदणीत विजयामुळे पक्षांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. काँग्रेसने आतापासून नियोजन, रणनिती आखून निवडणुकीच्या कामाला सुरुवात केलेली आहे.

राज्यात २०२१ मध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, वसई विरार, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर या पाच मोठ्या व महत्वाच्या महानगरपालिका निवडणुकी होत आहेत. तर दोन जिल्हा परिषदा, १३ नगर परिषदा व ८३ नगर पंचायतीसाठी निवडणुका होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी १३ सदस्यांची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केलेली आहे. तसेच या सर्व निवडणुकांसाठी पक्ष निरीक्षकांच्या नेमणुकाही करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय काँग्रेसच्या १२ मंत्र्यांकडेही संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी आहे. आतापासूनच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठका घेऊन राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना निवडणुकीत कशा पद्धतीने सामोरे गेले पाहिजे याचे मार्गदर्शनही केले जात आहे.

राज्य सरकारने एक वर्षांच्या कालावधीतच शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीनंतर १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज, चक्रीवादळानंतरही आर्थिक मदत, मच्छीमारांसाठी  पॅकेज दिलेले आहे. कोरोनासारख्या मोठ्या संकटालाही मोठ्या शिताफीने तोंड दिलेले आहे. कोरोना काळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात घरोघरी अन्नधान्याची मदत, औषधांची मदत केली, युवक काँग्रेसच्या माध्यमातून रक्तदान शिबीरे आयोजित केली. गरिब, कामगार, मजूर यांना मदतीचा हाथ दिला. तसेच नुकत्याच झालेल्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांमध्ये नागपूरसारखा भाजपा-आरएसएसचा ५० वर्षांचा बालेकिल्ला काँग्रेसने खेचून आणला तर पुण्यातही भाजपाचा सपाटून पराभव केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमधील उत्साह व चैतन्य आणखी वाढले आहे.  

राज्यात सध्या तीन पक्षाचे सरकार असले तरी काँग्रेसने कंबर कसली असून काँग्रेसचे सर्व नेते मोठ्या उत्साहाने कामाला लागले आहेत. काँग्रेसला आणखी उभारी देण्यासाठी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधत सर्व तयारी सुरु केलेली आहे. राज्यात सत्ता आहेच, त्यात तीन पक्ष एकत्र आले तर भाजपाचा पराभव करणे फारसे अवघड नाही हा आत्मविश्वासही कार्यकर्त्यांमध्ये वाढीस लागल्याने भाजपाला धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे.

Previous Post

महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करा, पक्ष सर्व मदत करेल !: अस्लम शेख

Next Post

सहायक अभियंताच्या दालनासमोर मनसेचे आंदोलन

Next Post
सहायक अभियंताच्या दालनासमोर मनसेचे आंदोलन

सहायक अभियंताच्या दालनासमोर मनसेचे आंदोलन

उद्यानाला नामफलक लावा अन्यथा आठवडाभरात उद्यानाचे नामकरण करणार : राष्ट्रवादीचा इशारा

उद्यानाला नामफलक लावा अन्यथा आठवडाभरात उद्यानाचे नामकरण करणार : राष्ट्रवादीचा इशारा

कोपरखैराणे, प्रभाग 42 मधील सेक्टर 16, 17, 22, 23 परिसरात पाहणी अभियान राबवूून वृक्षछाटणी करा

कोपरखैराणे, प्रभाग ४२ मध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com