नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या महापालिका स्तरावरील स्वच्छता प्रभाग स्पर्धेत नवी मुंबईमध्ये प्रभाग 96चा प्रथम क्रमांक आला आहे. विभागिय जनतेने दिलेल्या योगदानामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे स्थानिक नेतृत्व जनसेवक गणेश भगत यांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई शहराचा स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक यावा यासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी गेल्या काही महिन्यापासून केली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरात नेरूळ सेक्टर 16,16ए आणि 18 या परिसराचा समावेश होत असलेल्या प्रभाग 96चा प्रथम क्रमांक यावा यासाठी जनसेवक गणेश भगत, माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी प्रशासन दरबारी पाठपुरावा केशला होता. महापालिका अधिकाऱ्यांचे पाहणी अभियानही वेळोवेळी राबविले होते. महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि नेरूळ विभाग अधिकारी यांना स्वच्छता अभियानात प्रभाग स्वच्छतेसाठी करावयाच्या कामाबाबतही सातत्याने पाठपुरावा केशला होता.
प्रभागातील रस्ते, पदपथ व उद्यानासह, रस्त्यांची दुरावस्था यासह प्र्रभागातील अंर्तगत भागातही रंगरंगोटी व प्रबोधनात्मक सुभाषितांबाबत आग्रही पाठपुरावा गणेश भगत आणि सौ. रुपाली किस्मत भगत यांनी प्र्रशासन दरबारी केला होता. महापालिका अधिकाऱ्यांना घेवून गणेश भगत आणि सौ. रुपाली किस्मत भगत यांनी वेळोवेळी पाहणी अभियान राबवून समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता प्रभाग स्पर्धेत जाहिर करण्यात आलेल्या निकालामध्ये प्रभाग 96चा प्रथम क्रमांक जाहिर झाला आहे. हा पुरस्कार गणेश भगत व माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्या पाठपुराव्यामुळे व कार्यामुळे प्राप्त झाला असल्याची प्रभागातील रहीवाशांकडून व्यक्त केली जात आहे.