समाजसेवक पांडुरंग आमलेंच्या पाठपुराव्यामुळे रहीवाशांना मॅटवरच्या कुस्त्यांचा आनंद घेता येणार
नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघातील सानपाडा नोडमध्ये सानपाडा सेक्टर ३ येथील कुस्तीगीर संकुलासाठी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून ५ लाख रूपये मंजुर केले आहेत. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना त्याबाबत लेखी पत्रही दिले आहे. त्यामुळे स्थानिक भागातील आ. मंदाताई म्हात्रे यांचे कडवट समर्थक असणाऱ्या समाजसेवक पांडुरंग आमले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे लवकरच सानपाडावासियांना आता मातीऐवजी मॅटवरील कुस्त्यांचा आनंद घेता येणार आहे.
बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सानपाडा कुस्तीगीर संकुलासाठी ५ लाखाचा निधी दिला असून आपल्या आमदार फंडातून कुस्तीसाठी मॅट व साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी पत्र दिल्याने सानपाडा व सभोवतालच्या कुस्तीप्रेमींना नववर्षाची आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ही भेट दिली असल्याचे पांडुरंग आमले यांनी सांगितले. मॅट व इतर साहीत्य आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपलब्ध करून द्यावे यासाठी पांडुरंग आमले यांनी पाठपुरावाही केला होता. कुस्तीगीर संकुलासाठी ज्या काही सुविधा लागतील तसेच कुस्तीगीरांच्या ज्या अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी पांडुरंग आमले हे आमदार मंदाताई म्हात्रेंच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय कामकाज पाहणार आहेत. या कामी कुस्ती संघठक धनराज शेवाळे व दत्ता ठुबे यांनीही सहकार्य केल्याचे आमले यांनी यावेळी सांगितले. सानपाडा, जुईनगर, नेरूळ भागात कुस्तीप्रेमी मराठी भाषिकांची संख्या प्रचंड असून नववर्षाची आमदार मंदाताई म्हात्रेंकडून ही भेट मिळाल्याने लवकरच मॅटवरच्या कुस्त्या पहावयास मिळणार असल्याची प्रतिक्रिया कुस्तीप्रेमींनी व्यक्त करताना आ. मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले आहेत.