संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२०००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
सिडकोच्या शहर अभियंताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घातला घेराव
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील बेलापुर किल्ल्याचे सुरू असलेले काम समाधानकारक होत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सिडको अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरले आहे.
राज्य पुरातत्व विभाग यांनी पाहणी केल्यानंतर देखील पुरातन व संवर्धनाचे नियम डावलून बेलापूर किल्ल्याचे केलेले सिमेंटीकरणाचे काम अद्यापि सिडकोकडून हटवले न गेल्याने राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष नितीन नाना चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यासमवेत सिडको शहर अभियंता यांना घेराव घातला.
किल्याच्या कामासाठी नेमलेले ‘किमया कन्सलटंट’ यांनी सिडकोला दिलेल्या अर्धवट माहिती व सिडको कार्यकारी अभियंता यांच्या निष्काळजीपणामुळे किल्ल्याच्या झालेल्या 10 टक्के कामामध्ये साधारण 50 लाखाचे सिमेंटिकरण झाले असून ते तात्काळ हटवावे व अशा कंत्रातदारावर कारवाई करून झालेली नुकसान भरपाई वसूल करावी, तसेच या कामावर अंकुश ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाने 10 दिवसात संवर्धन अधिकारी नेमावा, तोपर्यंत काम थांबवावे अशी मागणी नितीन चव्हाण यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बेलापुर विधानसभा उपाध्यक्ष आकाश पाटील, संदीप मोहिते, अमोल मापारी, विशाल भिलारे, राम पुजारे, विश्वजित भोईटे व इतर पदाधिकारी होते.