
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimuabailive.com@gmail.com
नवी मुंबई : भाजपाच्या बेलापुर विधानसभा मतदारसंघातील आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाड्यातील आमदार मंदाताई म्हात्रे यांचे कडवट समर्थक पांडुरंग आमले यांनी तब्बल ७ दिवस सानपाड्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्या वर्षभरात भाजपा कार्यकर्ता म्हणून पांडुरंग आमले यांनी सातत्याने विविध लोकोपयोगी उपक्रम वाढविताना भाजपाचा जनाधार वाढविण्याचे काम केले आहे.
दिनांक १४ व १५ जानेवारीदरम्यान ब्लॅक अॅण्ड ब्युटी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धेसाठी काळ्या रंगाची साडी नेसून व सोन्याचे आभूषण घातलेला फोटो व्हॉटस अपवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा केवळ प्रभाग ७६ मधील महिला व मुलींसाठी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणाऱ्यांना पांडुरंग आमले ९३२६२५२५१२, रमेश शेटे ८६९३८२५६७७, आज्ञा गव्हाणे ९५९४९२७३७४. या व्हॉटस अप क्रमाकांवर आपली छायाचित्रे पाठवायची आहेत.
दिनांक १६-१७ जानेवारी रोजी सानपाडा सेक्टर २ येथील खेळाचे मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भाजपाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत , नवी मुंबई महापालिकेतील माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे , नवी मुंबई भाजपाचे महामंत्री निलेश म्हात्रे, नवी मुंबई भाजपा महामंत्री डॉ. राजेश पाटील, नवी मुंबई भाजपा महामंत्री विजय घाटे, नवी मुंबई भाजपा महामंत्री सतीश निकम यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
१८ जानेवारी रोजी सकाळी कॅरम स्पर्धा, सांयकाळी ६ ते ८ लहान मुलांची नृत्य स्पर्धा, सांयकाळी : ८ ते १० वेशभूषा व अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमांना अस्मिता सुर्वे (सिनेस्टार – फेम ढोलकीच्या तालावर) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. १९ जानेवारी रोजी सानपाडा सेक्टर ८ क्रिडांगणावर दुपारी १२ ते २ दरम्यान: पाककला स्पर्धा तर सांयकाळी हळदी कुंकू समारंभांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
२० जानेवारी रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये रक्तदान शिबिर, पूर्ण बॉडी चेकअप, नेत्र चिकीत्सा शिबिर, स्त्रीरोग तज्ज्ञांचे व्याख्यान याचा समावेश आहे. बेलापुर विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांचे आमदार निधीतून निवारण करणाऱ्या व कोरोना काळात मतदारसंघातील नागरिकांची मातेसमान काळजी घेणाऱ्या मातृतुल्य आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या उपक्रमामध्ये सानपाडावासियांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक पांडुरंग आमले यांनी केले आहे.