• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, March 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 21, 2021

जुईनगरमधील ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

adminbyadmin
in Uncategorized
0
जुईनगरमधील ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ -९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : जुईनगरमधील विरंगुळा केंद्रात येणाऱ्या ज्येष्ठांना ज्या ज्या समस्या जाणवतील, त्या समस्यांचे तात्काळ निवारण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

जुईनगरमधील ज्येष्ठ नागरिकांनी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणिस संतोष शेट्टी व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्यासमवेत पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेवून या भेटीत आपल्या समस्यांचा पाढा वाचला. त्यावर आयुक्त अभिजित बांगर यांनी तात्काळ पालिका प्रशासनाला निर्देश दिले.

जुईनगर सेक्टर २४ परिसरात चिंचोली तलावाजवळील उद्यानात महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी  विरगुंळा केंद्राची निर्मिती केलेली आहे. या केंद्रात स्थानिक परिसरातून येणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या महिलांकडून स्वतंत्र  शौचालयाची मागणी सातत्याने केली जात आहे. स्वतंत्र शौचालय नसल्याने महिलांची कुचंबना होत आहे. ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी या केंद्रात व बाहेरील परिसरात सीसीटीव्ही बसविणे आवश्यक  आहे. या केंद्रासमोरच उद्यानात महापालिका  प्रशासनाने खेळणी बसविली आहेत. त्यामुळे महिलांना केंद्राबाहेरील जागेचा वापर करता येत नाही. ही खेळणी उद्यानात अन्यत्र हलविल्यास महिलांना केंद्राबाहेरील जागेचा  वापर करता येईल. या केंद्रात येणाऱ्या ज्येष्ठ महिलांच्या मागण्यांवर लवकरात  लवकर सकारात्मक विचार करून त्यांना सुविधा देण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी पालिका आयुक्तांकडे केली.

कोरोनामुळे विरंगुळा केंद्र पालिका प्रशासनाने बंद केल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. कोरोना आता आटोक्यात आला असून उद्यानेही सुरू झाली आहेत. त्यामुळे विरंगुळा केंद्र लवकर सुरू करण्याची मागणी यावेळी ज्येष्ठांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी यावर कार्यवाही करण्याचे मान्य केले.

यावेळी शिष्टमंडळात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष  अंकुश नलावडे, मुकुंद कांबळे, खजिनदार बुद्देशक दरेकर, बद्रिके, केशव गांगुर्डे, अशोक हिंजे, बाबुराव जाधव सहभागी झाले होते.  समस्या जाणून घेतल्यावर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी तात्काळ फोन करून संबंधित अधिकारी यांना समस्या सोडविण्याचे आदेश दिले.

Previous Post

प्रभागात पाहणी अभियान राबवा : मा. नगरसेविका रूपाली भगत

Next Post

प्रभाग ७६ मध्ये आ. मंदाताई म्हात्रेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

Next Post
प्रभाग ७६ मध्ये आ. मंदाताई म्हात्रेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

प्रभाग ७६ मध्ये आ. मंदाताई म्हात्रेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

प्रभाग क्रं  ९६ मधील वीज समस्या एमएसईडीसीने तात्काळ सोडवाव्यात : सौ. रूपाली किस्मत भगत

प्रभाग क्रं ९६ मधील वीज समस्या एमएसईडीसीने तात्काळ सोडवाव्यात : सौ. रूपाली किस्मत भगत

अर्णब गोस्वामींना लवकरात लवकर अटक करा : अतुल लोंढे

अर्णब गोस्वामींना लवकरात लवकर अटक करा : अतुल लोंढे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com