• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 24, 2021

अर्णब गोस्वामींना लवकरात लवकर अटक करा : अतुल लोंढे

adminbyadmin
in Uncategorized
0
अर्णब गोस्वामींना लवकरात लवकर अटक करा : अतुल लोंढे

मुंबई : मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासातून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअप चॅटमधील अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. ५१० पानांच्या या चॅटमध्ये  न्यायाधिशांना विकत घेण्याची भाषा केली आहे, हे अत्यंत गंभीर असून न्यायव्यवस्थचे स्वातंत्र्य अबाधित होते त्याला कुठेतरी डाग लावण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. न्यायाधिशांनी स्वेच्छाधिकारने याची दखल घेणे गरजेचे होते परंतु जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडू नये यासाठी चौकशी होणे गरजेचे असून त्यासाठी अर्णब गोस्वामीला लवकरात लवकर अटक करुन सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

अतुल लोंढे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, अभिनेता सुशांतसिंह राजपुतचे प्रकरण पाटण्यातून मुंबईला हलवण्याची रिया चक्रवर्तीची याचिका सुप्रीम कोर्टात होती ती मान्य करण्यात आली नाही त्यामागे अर्नब गोस्वामी होते असे या चॅटमधून दिसते. तसेच टीआरपी प्रकरणात दिग्गज वकील न्यायालयात बाजू मांडणार आहेत तुम्ही न्यायाधिशांना विकत घ्या असा सल्ला देण्यात आलेला आहे. या लोकांनी न्याय व्यवस्थेतही घुसखोरी केली असून न्यायाधीशही विकत घेतले जाऊ शकतात असा संदेश जनतेत जात आहे. यातून सरन्यायाधिश यांच्या कारकिर्दीवरही बोट ठेवल्यासारखे आहे. न्यायव्यवस्थेचे पावित्र्य व स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे.

यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की,या चॅटमध्ये हरकत घेण्यासारखे अनेक मुददे आहेत. न्यायव्यवस्थेला स्वतःच्या स्वार्थासाठी खरेदी करता येऊ शकते असे त्या चॅटमध्ये आलेले आहे ते अत्यंत गंभीर आहे. न्याय पालिकेवर लोकांचा विश्वास आहे. त्यातील न्यायाधिश विकत घ्या, असा सल्ला देणे अत्यंत गंभीर असून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले.

Previous Post

प्रभाग क्रं ९६ मधील वीज समस्या एमएसईडीसीने तात्काळ सोडवाव्यात : सौ. रूपाली किस्मत भगत

Next Post

प्रभाग ९६ मधील समस्या सोडविण्याचे महावितरणचे आश्वासन

Next Post
प्रभाग ९६ मधील समस्या सोडविण्याचे  महावितरणचे आश्वासन

प्रभाग ९६ मधील समस्या सोडविण्याचे महावितरणचे आश्वासन

जुईनगरमधील तनुजा मढवींनी ‘कमळा’ला रामराम करत हाती बांधले ‘घड्याळ’

जुईनगरमधील तनुजा मढवींनी ‘कमळा’ला रामराम करत हाती बांधले ‘घड्याळ’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त प्रभाग ८७ मध्ये कार्यक्रमांची मांदियाळी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त प्रभाग ८७ मध्ये कार्यक्रमांची मांदियाळी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com