• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 26, 2021

आपल्या कन्येच्या नावासह वृक्षारोपण करीत आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी दिला बालिका व वृक्ष संवर्धनाचा संदेश

adminbyadmin
in Uncategorized
0
आपल्या कन्येच्या नावासह वृक्षारोपण करीत आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी दिला बालिका व वृक्ष संवर्धनाचा संदेश

 नवी मुंबई : महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने दि. २१ ते २६ जानेवारी २०२१ या कालावधीत संपन्न झालेल्या राष्ट्रीय बालिका सप्ताहाची सांगता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्यासह इतर अधिकारी यांच्या हस्ते आपापल्या कन्येच्या नावासह वृक्षारोपण करून नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे वसुंधरा अभियान अंतर्गत संपन्न झाली.

            याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, मुख्य लेखा परीक्षक श्री. दयानंद निमकर, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त श्रीम. क्रांती पाटील तसेच उपआयुक्त श्री. मनोजकुमार महाले, डॉ. बाबासाहेब राजळे, श्री. योगेश कडुस्कर, डॉ. श्रीराम पवार, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरीष आरदवाड व मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

            २४ जानेवारी २०२१ रोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला व बालविकास विभागामार्फत २१ ते २६ जानेवारी २०२१ या कालावधीत राष्ट्रीय बालिका सप्ताह साजरा करण्याचे निर्देशित करण्यात आले होते. यामध्ये मुलींच्या जन्माबाबत जनजागृती तसेच मुलींच्या समस्या व त्यावर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे सूचित करण्यात आले होते.

            त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बालिका कल्याण विषयक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये २३ जानेवारी रोजी PCPNDT आणि MTP या कायद्यांविषयी आयोजित मार्गदर्शनपर वेबिनारमध्ये सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली मगदूम यांनी माहितीपूर्ण विवेचन केले. दि. २४ जानेवारी रोजी डॉ. सुचेता किंजवडेकर यांनी  मासिक पाळी काळातील स्वच्छता आणि आरोग्य याविषयी वेबसंवाद साधला. दि. २५ जानेवारी रोजी विविध योजनांचा किशोरवयीन मुलींवरील प्रभाव याविषयी वेबिनारमधून श्रीम. स्वप्नाली चौधरी यांनी प्रकाशझोत टाकला. 

            याशिवाय 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोव्हीड काळात उल्लेखनीय काम करणा-या आरोग्य व स्वच्छता विभागातील 5 महिला कर्मचा-यांचा ध्वजारोहणानंतर आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या राष्ट्रीय बालिका सप्ताहाची सांगता वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने वैशिष्ट्यपूर्ण रितीने आयुक्तांसह इतर अधिकारीवर्गाने आपल्या मुलींच्या नावे वृक्षारोपण करून बालिका व वृक्ष संवर्धनाचा सकारात्मक संदेश जनमानसात प्रसारित करीत केली. 

Previous Post

दिल्लीतील परिस्थितीला मोदी सरकारचा अहंकार जबाबदार !: बाळासाहेब थोरात

Next Post

‘आगरी-कोळी सांस्कृतिक भवन सुरू न केल्यास टाळे तोडणार : मनोज मेहेर

Next Post
आगरी-कोळी सांस्कृतिक भवन विवाह समारंभासाठी खुले करा : मनोज मेहेर

‘आगरी-कोळी सांस्कृतिक भवन सुरू न केल्यास टाळे तोडणार : मनोज मेहेर

आ. मंदाताई म्हात्रेंच्या वाढदिवसानिमित्त पांडुरंग आमलेंकडून कार्यक्रमाची मांदियाळी

सानपाड्यात पांडुरंग आमलेंच्या माध्यमातून प्रभाग ७६ मध्ये कमळ फुलणार!

षटकार सोसायटीत नामदेव भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण

षटकार सोसायटीत नामदेव भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com