• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 21, 2021

रविवारी कोरोनाचा आकडा पोहोचला चारशे पार

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या काही दिवसापासून नवी मुंबईकरांमध्ये वर्तविण्यात येत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी पाहता कोरोनाची दुसरी लाट महाभयावह राहणार असल्याचे वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली असल्याची भीती आता नवी मुंबईकरांकडून  व्यक्त करण्यात येत आहे. नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी पाहता शहर आज कोरोना उद्रेकाच्या उंबरठ्यावर येवून पोहोचले आहे. रविवार, दि. २१ मार्च रोजी महापालिका प्रशासनाकडून प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार ४१६ नवी मुंबईकरांना कोरोनाची नव्याने लागण झाली असून २  कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर १५० कोरोनाग्रस्त  कोरोनामुक्त  होवून घरी परतले आहेत.

आजच्या ४१६ कोरोनाग्रस्तांमध्ये नेरूळ विभागात सर्वाधिक म्हणजेच  तब्बल ८४ कोरोनाग्रस्त नव्याने आढळून आले आहेत. बेलापुर विभागात कोरोनाचे ४५ रूग्ण, वाशी विभागात कोरोनाचे ६५ रूग्ण, तुर्भे विभागात कोरोनाचे ५५ रूग्ण, कोपरखैराणे विभागात कोरोनाचे ५४ रूग्ण, घणसोली विभागात कोरोनाचे ४७ रूग्ण, ऐरोली विभागात कोरोनाचे ६१ रूग्ण तर दिघा विभागात ५ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत.

रविवारी ४२२ नवी मुंबईकरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅपिड अॅंण्टीजेन टेस्ट करून घेतली. आजवर ३ लाख १७ हजार ८९५ लोकांनी ही टेस्ट करून घेतली आहे तर ६ लाख ०२ हजार ५७१ लोकांनी आजवर कोव्हिड १९ चाचणी आजवर करून घेतली आहे. कोरोनाने आज तीनशेचा आकडा ओलांडताच नवी मुंबईकरांचा खऱ्या अर्थाने काळजाचा ठोका चुकला आहे. सार्वजनिक जागी वाढलेली गर्दी, मार्जिनल स्पेस तर सोडा मार्जिनल स्पेससमोरील पदपथावरही  दुकानचालकांचे अतिक्रमण, ग्राहकांसह दुकानमालक विना मास्क करत असलेले व्यवहार, पदपथावर गृहनिर्माण  सोसायट्यांच्या कचराकुंड्यांची दुर्गंधी, स्वच्छतेबाबत आयुक्तांच्या सूचनांना पालिका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीच दाखविलेली केराची टोपली यामुळे कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढत चालली आहे. आजची आकडेवारी ‘अब की बार तीनसौ पार, कोरोनाच्या उद्रेक पोहोचला आता शहराच्या कानाकोपऱ्यात’ ही भीती  आता नवी मुंबईकरांच्या चेहऱ्यावर उघडपणे पहावयास मिळू लागली आहे.

स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक मिळविण्याच्या नादात केवळ भिंती रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्याच्या नादात महापालिका वाढत्या बकालपणाकडे कानाडोळा करू लागली आहे. भिंतीची रंगरंगोटी करताना पदपथावर असलेल्या कचराकुंड्या, यामुळे पदपथाला आलेला बकालपणा, लोकांना चालण्यासाठी करावा लागणारा पदपथाऐवजी रस्त्याचा वापर, शहरात वाढलेली फेरीविक्रेत्यांची संख्या, रस्त्यारस्त्यावर फेरीविक्रेत्यांच्या वाढलेल्या हातगाड्या वाहतुक कोंडीला खतपाणी घालत आहेत. दुकानदारांनी मार्जिनल स्पेस बळकावून त्यापुढील पदपथावरही दुकानाचे सामान ठेवून त्यावर अतिक्रमण केले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने यावर कारवाई न करता अतिक्रमण व हातगाड्या व्यावसायिक, मार्जिनल स्पेससमोरील पदपथ बळकावणारे दुकानदार या सर्वाशी ‘अर्थ’युक्त संबंध ठेवल्याने बकालपणाला खतपाणी मिळून रोगराई वाढीला हातभार लावला असल्याचे नवी मुंबईकर उघडपणे बोलू लागले आहेत. भिंतीची रंगरंगोटी करून शहर सुशोभीकरणाचा देखावा न करता नवी मुंबईकरांना कोरोनामुक्त करण्यासाठी आतातरी गंभीर व्हा असा टाहो नवी मुंबईकरांकडून फोडला जात आहे. कोरोनाचा आकडा ४००च्या पुढे गेल्याने महापालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे.

  •  
Previous Post

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

Next Post

कामगार नेते रवींद्र सावंत यांनी घेतली कोरोनाची लस

Next Post
कामगार नेते रवींद्र  सावंत यांनी घेतली कोरोनाची लस

कामगार नेते रवींद्र सावंत यांनी घेतली कोरोनाची लस

महाराष्ट्रातील जनतेची मरणं तरी गांभीर्याने घ्या : नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप

शेतकरी संघटनांच्या २६ मार्चच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा : नाना पटोले

महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची इंटकची मागणी

महापालिका आस्थापनेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवरील अन्याय दूर करा : रवींद्र सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com