• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 9, 2021

‘दिल्लीत बसून राजीनामे मागण्यापेक्षा पुण्याला मदत मिळवून द्या’

adminbyadmin
in Uncategorized
0
‘दिल्लीत बसून राजीनामे मागण्यापेक्षा पुण्याला मदत मिळवून द्या’

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर मोहन जोशींचे टीकास्त्र

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ – Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : महाराष्ट्र कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्याला तसेच पुण्याला भरघोस मदत मिळवून द्यायला हवी होती. राज्य संकटात असताना जावेडकर मात्र त्यांचे कर्तव्य न बजावता राज्य सरकारचा राजीनामा मागत आहेत, हे ढोंगी राजकारण असल्याची टीका माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

जावडेकरांचा समाचार घेताना मोहन जोशी म्हणाले की, राज्य सरकारची कोंडी करून मविआ सरकारला अपयशी ठरविण्याचा भाजप नेत्यांचा कुटील डाव आहे. केंद्रीय मंत्री  प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची वक्तव्ये हा त्याच डावाचा एक भाग आहे. प्रकाश जावडेकर हे पुण्याचे रहिवासी आहेत, पुण्यात भाजपचे खासदार, चार आमदार, शंभर नगरसेवक आहेत. यांच्यामार्फत जावडेकर यांनी पुण्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करायला हवी होती. केंद्र सरकारकडून ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर, कोरोना लस, रेमडेसिवीरच्या सुविधा पुरवायला हव्या होत्या. पुण्यात कोविड साथीने थैमान मांडले असताना जावडेकर यांनी  याचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारकडून अधिकाधिक मदत होईल याची दक्षता घ्यायला हवी होती. हे न करता जावडेकर राज्य सरकारच्या राजीनाम्याची मागणी करतात यामागे भाजपाचा कुटील डाव आहे.

पुण्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, अशा गंभीरवेळी गर्दी टाळणे हा उपाय असताना भाजप नेत्यांना त्याचे भान राहिलेला नाही. सरकार विरोधात आंदोलन करण्याच्या नावाखाली भाजपाने रस्त्यावर गर्दी जमवून आंदोलने करण्याची गरज नव्हती. सध्याची परिस्थिती पाहता साथीच्या तडाख्यापासून लोकांचे बचाव करणे, जीव वाचविणे गरजेचे आहे. सध्याची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन भाजपच्या नेत्यांनी राजकारण बाजून ठेवून या महामारीवर मात करण्यासाठी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन मोहन जोशी यांनी केले आहे.

Previous Post

दहावी-बारावी परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात : आशिष शेलार

Next Post

तामिळनाडूच्या शोगनूर मधील दलितांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध : रामदास आठवले

Next Post
कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा  निर्णय योग्य

तामिळनाडूच्या शोगनूर मधील दलितांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध : रामदास आठवले

कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे वेतन द्या : मनसे

कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे वेतन द्या : मनसे

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

नवी मुंबईत शुक्रवारी नव्या १०३३ कोरोना रूग्णांची वाढ, ५ मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com