सुजित शिंदे : ९६१९१९७४४ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्राला कोरोना बसलेला विळखा वाढत चाललेला असतानाच केंद्र सरकारकडून राज्याला लस उपलब्ध करून देण्यास केंद्र सरकारकडून जाणिवपूर्वक विलंब केला जात असल्याचे सांगत नवी मुंबई कॉंग्रेसचे नेते रवींद्र सावंत यांनी कार्यकर्त्यासमवेत नेरूळमधील आपल्या जनसंपर्क कार्यालयासमोर ‘थाळीनाद’ आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला.
नवी मुंबईतही लसीचा (वॅक्सिन) तुटवडा जाणवू लागला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातही हेच चित्र दिसून येत आहे. राज्याची लोकसंख्या आणि कोरोना रूग्णांची देशातील सर्वाधिक या ठिकाणी आढळून येणारी संख्या, ४५ वर्ष वयावरील लोकसंख्या पाहता उपलब्ध करून द्यायला पाहिजे, तितका लसीचा साठा केंद्र सरकार देत नसून राज्य सरकारची अडवणूक करत असल्याचे सांगत कॉग्रेस नेते रवींद्र सावंत यांनी थाळीआंदोलनातून आपला संताप व्यक्त केला.
नेरूळ सेक्टर २ मधील कॉंग्र्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात कॉंग्रेसचे नेते रवींद्र सावंत यांनी आज सांयकाळी आपल्या कार्यकर्त्यासमवेत जोरदार घोषणाबाजी करत थाळीआंदोलन करत सर्वसामान्यांच्या भावनेला वाट मोकळी करून दिली असल्याची प्रतिक्रिया उपस्थित रहीवाशांनी यावेळी व्यक्त केली.
कोरोनाची लाट पाहता राज्य सरकारबाबत सर्वसामान्यात उद्रेक निर्माण व्हावा यासाठी लस पुरवठ्याचे केंद्र सरकारकडून जाणिवपूर्वक राजकारण केले जात असल्याचे सांगत रवींद्र सावंत यांनी सुधीर पांचाळ, महेश भोईटे, देसाई बुवा, सुमित लंबे, ताळेकर गुरुजी, संतोष पोळ या कार्यकर्त्यांसमवेत जोरदार घोषणाबाजी करत थाळीआंदोलन केले.