• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 12, 2021

राजसाहेब ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत ज्ञानार्पण सोहळा

adminbyadmin
in Uncategorized
0
राजसाहेब ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत ज्ञानार्पण सोहळा

स्वयंम पीआर एजंन्सी : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

५३ हजार घरांमध्ये पुस्तके भेट देण्याचा नवी मुंबई मनसेचा संकल्प

नवी मुंबई : १४ जून २०२१ रोजी सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवी मुंबई मनसेच्या वतीने ५३ हजार घरांमध्ये मोफत पुस्तके संपूर्ण वर्षभर भेट देण्याचा संकल्प नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी याप्रसंगी केलेला आहे. मराठी १०० पुस्तकांची यादीच मनसेने प्रसिद्ध केलेली आहे. त्यामधील आपल्या आवडत्या पुस्तकाची नोंदणी करण्याचे आवाहन मनसेने केले आहे. सदरच्या पुस्तकांच्या यादीमध्ये सुप्रसिद्ध लेखक/कवी मंगेश पाडगावकर, प्रबोधनकार ठाकरे, अण्णाभाऊ साठे, व. पु. काळे, ना. धों . महानोर, आचार्य अत्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विजय तेंडुलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, महात्मा गांधी, साने गुरुजी, वि. स. खांडेकर, डॉ. अब्दुल कलाम, सुरेश भट अशा कवी/लेखकांच्या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. यामध्ये श्यामची आई, फकिरा, अग्निपंख, जिप्सी, शूद्र पूर्वी कोण होते, माझी जीवनगाथा, पार्टनर व. पु. काळे, यशवंतराव आणि मी, वाघनखं , सखाराम बाईंडर, माझी जन्मठेप, नटसम्राट, सत्याचे प्रयोग, रंग आणि गंध, रसवंतीचा मुजरा, शिवछत्रपती एक मागोवा अशा अनेक प्रसिद्ध पुस्तकांची यादी आहे, असे नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मत सांगत असताना गजानन काळे यांनी असे म्हटले आहे कि, सन्मा. राजसाहेब ठाकरे हे सध्याच्या राजकारण व समाजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व असून विविध पुस्तके वाचण्याचा छंद राजसाहेबांना आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला अवगत आहे. पुस्तक वाचल्याने प्रगल्भ आणि सक्षम समाज घडवण्यास मोठी मदत होते आणि म्हणूनच नवी मुंबई शहरामध्ये वाचन संस्कृती रुजावी याकरिता नवी मुंबई मनसेचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे मत गजानन काळे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. कोविड च्या दुसऱ्या लाटेनंतर हळूहळू जीवन पूर्वपदावर येत असताना तसेच या सर्व प्रसंगांमधून नवी मुंबईतील नागरिक जात असताना लॉक डाऊन व कोविड च्या संकटामुळे नागरिकांच्या मनावर खोलवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. अशा वेळी पुस्तक त्यांना या परिस्थिती मधून बाहेर काढेल असा ठाम विश्वास गजानन काळे यांना आहे.

नवी मुंबई मनसेने या अभियानाची सुरुवात केल्यानंतर काही तासातच १५०० पुस्तकांची नोंदणी नवी मुंबईकरांनी केलेली आहे. तसेच सदर पुस्तकांची नोंदणी करण्याकरिता मनसेने दोन क्रमांक ९०९०५०५०६७ / ८१०८१८१००७ प्रसिद्ध केलेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नागरिक आपले आवडते पुस्तक नोंदवू शकतात. व्हाट्सअप , क्यू आर कोड, तसेच गुगल लिंकच्या माध्यमातून आपली माहिती देऊन आपले आवडते पुस्तक नागरिक नोंदवू शकतात. नवी मुंबईतील नागरिकांनी मोठ्या संख्येने या वाचन चळवळीत सहभाग नोंदवून वाचन संस्कृती वृद्धांगित करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे.

Previous Post

प्रभाग 96 मधील रहीवाशांना भाजपचा मदतीचा हात

Next Post

३२ वर्षांनी गाळ निघाला :आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न यशस्वी

Next Post
३२ वर्षांनी गाळ निघाला :आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न यशस्वी

३२ वर्षांनी गाळ निघाला :आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न यशस्वी

२०२४ साली राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल आणि येणारे सरकार ग्रामगीतेच्या विचारांवर चालेल: नाना पटोले

२०२४ साली राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल आणि येणारे सरकार ग्रामगीतेच्या विचारांवर चालेल: नाना पटोले

राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई मनसेच्या ‘घरोघरी पुस्तक’ अभियानाला सुरुवात

राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई मनसेच्या ‘घरोघरी पुस्तक’ अभियानाला सुरुवात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com