• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 12, 2021

२०२४ साली राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल आणि येणारे सरकार ग्रामगीतेच्या विचारांवर चालेल: नाना पटोले

adminbyadmin
in Uncategorized
0
२०२४ साली राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल आणि येणारे सरकार ग्रामगीतेच्या विचारांवर चालेल: नाना पटोले

स्वयंम पीआर एजंन्सी : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग हा फक्त मोझरी परिसरातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आहे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण वाटचाल करू. महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचा आधार घेऊनच ते सरकार काम करेल, असा मानस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भ दौऱ्यावर असून आज अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे त्यांनी काँग्रेस  कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, विदर्भाच्या दौऱ्यात आपण कष्टकरी, कामकरी, शेतकरी, गरिबांच्या व्यथा पाहिल्या आहेत. कोरोनामुळे या लोकांचे जगणे अवघड झाले आहे. एकीकडे कोरोनाशी सामना तर दुसरीकडे जगण्याची धडपड सुरु आहे. केंद्रातील मोदी सरकारने लोकांना जाणीवपूर्वक मरणाच्या दारात आणून ठेवले आहे. ऑक्सीजन, रेमडेसीवर या औषधांचा पुरवठा केंद्र सरकार करते तो वेळेवर व पुरेसा न केल्यामुळे हजारो लोकांचे जीव गेले. आताही बुरशी आजारावरचे इंजेक्शन केंद्राकडून वेळेवर व पुरेशा प्रमाणात मिळत नाही. शेतकरी सहा महिन्यापासून आंदोलन करत आहेत पण पंतप्रधान मोदींना या शेतकऱ्यांशी बोलावयास वेळ नाही. भाजपचे सरकार देशाला अधोगतीकडे घेऊन गेले आहे. काँग्रेसचा विचारच या देशाला वाचवू शकतो, संविधानाला वाचवू शकतो असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालक मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, आमदार बळवंत वानखेडे, माजी आमदार विरेंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

युवक काँग्रेसमार्फत सिव्हील हॉस्पिटल, अमरावती येथे मागील ४५ दिवसांपासून रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण तसेच गरजूंना विविध आरोग्यसेवा निस्वार्थपणे पुरवण्यात येत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज भेट देऊन युवक काँग्रेसच्या या चमूचे कौतुक केले.  अपंग जीवन विकास संस्था अमरावती द्वारा संचालित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राद्वारे गरजु दिव्यांग बांधवांना किराणा साहित्याचे वितरण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

Previous Post

३२ वर्षांनी गाळ निघाला :आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न यशस्वी

Next Post

राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई मनसेच्या ‘घरोघरी पुस्तक’ अभियानाला सुरुवात

Next Post
राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई मनसेच्या ‘घरोघरी पुस्तक’ अभियानाला सुरुवात

राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई मनसेच्या ‘घरोघरी पुस्तक’ अभियानाला सुरुवात

रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा : सचिन सावंत

सुशांतसिंगच्या मृत्यूचे सत्य सीबीआय का लपवत आहे ? सचिन सावंत

परिस्थिती चिघळविणाऱ्यावर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

परिस्थिती चिघळविणाऱ्यावर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com