• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 14, 2021

सुशांतसिंगच्या मृत्यूचे सत्य सीबीआय का लपवत आहे ? सचिन सावंत

adminbyadmin
in Uncategorized
0
रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा : सचिन सावंत

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

  • महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठीच भाजपाने सुशांतसिंगच्या आत्महत्येचा वापर केला. 
  • अँटिलीया प्रकरणातील मास्टरमाइंडला एनआयए का पकडू शकत नाही? 
  • मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची चौकशी का होत नाही?

 मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूला आज एक वर्ष लोटले. सुशांतची हत्या की आत्महत्या याचा तपास करणाऱ्या सीबीआय चौकशीला आज ३१० दिवस व एम्स पॅनेलने सुशांतच्या हत्येचा मुद्दा निकाली काढण्याला २५० दिवस  झाले. परंतु आजपर्यंत सुशांतच्या बाबतीत सीबीआय कोणत्याच निष्कर्षापर्यंत आलेली नाही. सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल ? सीबीआयने सत्य लपवून का ठेवले आहे ? अशी प्रश्नांची सरबत्ती करून सीबीआयवर दिल्लीतील राजकीय वरिष्ठांचा प्रचंड दबाव आहे हे स्पष्ट झाले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, सुशांतसिंगने आत्महत्याच केल्याचे मुंबई पोलिसांनी त्यांच्या तपासातून स्पष्ट केले होते. सुप्रीम कोर्टानेही मुंबई पोलिसांचा तपास योग्यच होता असे म्हटले आहे. असे असतानाही आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सुशांतसिंगच्या आत्महत्येला राजकीय रंग देत त्याचा बिहार विधानसभा निवडणुकीत मुद्दा बनवला होता. सुशांतसिंग प्रकरणात ड्रग कनेक्शनही उघड झाले होते त्याचे धागेदोरे भाजपाच्या अत्यंत जवळच्या लोकांपर्यंत असल्याचे आम्ही पुराव्यानिशी वारंवार उघड केले परंतु सीबीआय अथवा एनसीबीने त्याचा छडा लावला नाही. भाजपाचे नेते, प्रवक्ते आणि भाजपाच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या काही फिल्मस्टार्सनीही या बदनामी मोहिमेत सहभाग घेतला होता. सुशांतच्या निधनाला एक वर्ष झाल्यानंतरही सीबीआय कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहचू शकलेली नाही. केवळ महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच सुशांतसिंग प्रकरणाचा गैरवापर भाजपाने केला.    

अँटिलीया प्रकरणातही एनआयए मास्टरमाईंडपर्यंत अजून पोहचलेली नाही. अँटिलीया कट रचणारे बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेसह सर्व पोलीस अधिकारी तत्कालीन पोलीस आयुक्त कार्यालयातील होते व परमबीर सिंग यांच्या थेट हाताखाली काम करत होते असे असतानाही एनआयए मास्टरमाइंडला का पकडू शकत नाही? मास्टरमाईंडला संरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा त्याच्याशी काही गुप्त करार झाला आहे का? परमबीरसिंग यांची चौकशी का होत नाही?  एनआयएने कोर्टामध्ये जास्त वेळ मागितला आणि अद्याप काहीच का केले नाही? जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अँटेलिया प्रकरणातील परिस्थितीजन्य पुराव्यांपेक्षा परमबीर यांच्या निराधार आरोपांना जास्त महत्त्व दिले जात आहे. मविआला बदनाम करण्यासाठी मोदी सरकार एनआयए, ईडी व सीबीआयचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करत आहे. परंतु सत्य लपवता येत नाही अखेर सत्याचाच विजय होतो हे लक्षात ठेवा, असेही सावंत म्हणाले.

Previous Post

राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई मनसेच्या ‘घरोघरी पुस्तक’ अभियानाला सुरुवात

Next Post

परिस्थिती चिघळविणाऱ्यावर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

Next Post
परिस्थिती चिघळविणाऱ्यावर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

परिस्थिती चिघळविणाऱ्यावर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

धारावीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच एकनाथ गायकवाड यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ! नाना पटोले

बुथ कमिट्या मजबूत करून काँग्रेसचा विचार गाव- खेड्यात पोहचवा !: नाना पटोले

किल्ल्याचा बुरुज ढासळल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मावळ्यांच्या वेशात सिडको भवनला धडक

किल्ल्याचा बुरुज ढासळल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मावळ्यांच्या वेशात सिडको भवनला धडक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com