• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 17, 2021

प्रभाग ७६ मध्ये आ. मंदाताई म्हात्रेंकडून मोफत धान्य वाटप उत्साहात

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रभाग ७६ मध्ये आ. मंदाताई म्हात्रेंकडून मोफत धान्य वाटप उत्साहात

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

नवी मुंबई : बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते गुरूवारी (दि. १७ जुन) दुपारी प्रभाग ७६ मध्ये गरजू रहीवाशांना मोफत धान्याचे वाटप केले. भाजपाचे सानपाडा नोडमधील युवा नेते पांडुरंग आमले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कोरोना महामारीच्या काळात हतबल झालेल्या प्रभाग ७६ मधील  गरजू रहीवाशांना दिलासा देण्यासाठी पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून आ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते ५०० गरजू परिवारांना हे धान्य वाटप करण्यात आले. अजून १०० परिवार बाकी असल्याने दोनच दिवसात या परिवारांना धान्य देणार असल्याची माहिती पांडुरंग आमले यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास स्थानिक रहीवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सानपाडा नोडमध्ये अनेक जण आपल्या नेत्यांकडून धान्य आणून त्यावर चमकेशगिरी करत असताना त्याउलट पांडुरंग आमले यांनी स्वत:चे पैसे खर्च करून  गरजू परिवारांसाठी धान्य विकत आणले व आपल्या नेत्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते ते वितरीत केले. यामुळे स्थानिक रहीवाशांकडून पांडुरंग आमले यांचे जाहिरपणे आभारही मानण्यात आले. यावेळी आ. मंदाताई म्हात्रे यांनी कोरोना महामारीच्या काळात जानेवारी २०२० पासून प्रभाग ७६ मधील जनतेसाठी व सानपाडावासियांसाठी पांडुरंग आमले यांनी केलेल्या जनहितैषी कार्याची प्रशंसा केली.

या धान्य वाटप कार्यक्रमास आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, भाजयुमोचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे , नेरूळ गावातील युवा समाजसेवक देवनाथ म्हात्रे, टायगर ग्रुपचे उपाध्यक्ष संतोष बनगर,ओव्हाळ  व सर्व पदाधिकारी, राजेश राय, सिंग, निवारा सोसायटीच्या हागवणे,  वाघमारे, सुयोग सोसायटीचे नायसे, फडतरे, प्रियंका सोसायटीतील सोनी, वाव्हळ, स्वस्तिक सोसायटीचे नाना शिंदे, ओपिजे सोसायटीच्या ब्रिगेन्झा, कोहिनूर सोसायटीचे अमित लांडगे, आदर्श सोसायटीचे राणे, त्याचबरोबर पदाधिकारी  शशी नायर, महेश मढवी, सौ आज्ञा गव्हाणे, पंकज दळवी, सौ. शारदा आमले, आंग्रे, श्वेता मढवी, वाव्हळ, निंबाळकर, प्रियांका वडगाई,  दिशा केणी, नवनाथ सुतार, भार्गव मढवी, श्रीकांत गायकवाड, सुधीर आंग्रे, रुपेश मढवी, पत्की काका, श्रीकांत  भिलारे व साईभक्त युवा मंच सर्व युवा, साईभक्त महिला फाउंडेशन सर्व  सभासद, साईभक्त सेवा मंडळ सदस्य उपस्थित  होते. कार्यक्रमाचे ससूत्रसंचालन अरुण आहिरे यांनी केले.

Previous Post

सिडकोने घेतलेले सेवा शुल्क महापालिका करणार परत

Next Post

आमदार सौ.मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून देण्यात आलेल्या २ रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उत्साहात

Next Post
आमदार सौ.मंदा म्हात्रे  यांच्या आमदार निधीतून देण्यात आलेल्या २ रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उत्साहात

आमदार सौ.मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून देण्यात आलेल्या २ रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उत्साहात

२४ जून रोजी भूमीपुत्र आपल्या आराध्य दैवतासाठी घालणार सिडकोला हजारोंच्या संख्येने घेराव

२४ जून रोजी भूमीपुत्र आपल्या आराध्य दैवतासाठी घालणार सिडकोला हजारोंच्या संख्येने घेराव

रस्त्यावर साचणारे पाणी, पदपथावरील मातीचे ढिगारे हटवा : महादेव पवार

रस्त्यावर साचणारे पाणी, पदपथावरील मातीचे ढिगारे हटवा : महादेव पवार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com