• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 18, 2021

२४ जून रोजी भूमीपुत्र आपल्या आराध्य दैवतासाठी घालणार सिडकोला हजारोंच्या संख्येने घेराव

adminbyadmin
in Uncategorized
0
२४ जून रोजी भूमीपुत्र आपल्या आराध्य दैवतासाठी घालणार सिडकोला हजारोंच्या संख्येने घेराव

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

नेरुळ येथील बैठकीत २९ ग्रामस्थांचा निर्धार.!

नेरूळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनायक दि. बा. पाटील नामाकरणासाठी प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्र व शहरातील विविध घटकांतील नागरिक हे सर्वजण आता सरकार विरोधात संघर्ष करण्यास उतरले आहेत. १० जून रोजी झालेल्या मानवी इशारा साखळी आंदोलनात सर्वांनी बेलापूर ते दिघा या ठाणे बेलापूर पट्टीतील सर्वच भूमीपुत्र व शहर तसेच झोपडपट्टीतील नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी अत्यंत शांततेने व शिस्तीने उतरून जी एकजूट दाखवून दिलीत त्याबद्दल त्यासर्वांचंच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्र समितीच्या वतीने आभार व्यक्त केले.

       या संघर्षांतील यापुढील पाऊल आहे, ते म्हणजे येत्या २४ जून रोजी स्वर्गीय दि. बा.पाटील साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच सिडको भवनाला लाखोंच्या संख्येने मोर्चा नेऊन घेराव घालायचा आहे. ज्यात रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण व अन्य तालुके त्याचप्रमाणे आपली नवी मुंबईतील सर्व गावे, ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील आगरी, कोळी, कराडी, भंडारी, कुणबी व इतर समाज व विशेषतः मुंबईतील मूळ भूमीपुत्रांची साथ देखील लाभुन आपल्या सर्वांचे हाथ संघर्षासाठी अधिक बळकट होणार आहेत.

       सदर २४ तारखेच्या घेराव आंदोलना बाबतच्या नियोजन, आखणी व अन्य बाबींबाबत चर्चा व मार्गदर्शन व्हावे याकरिता आज गुरुवार दिनांक १७ जून रोजी सायंकाळी ठिक ५.३० वाजता बैठक शिरवणे विद्यालय, सेक्टर ०२, नेरुळ याठिकाणी संपन्न झाली. या बैठकीस सर्व स्थानिय समिती समन्वयक,ग्राम समन्वयक व या लढ्यासाठी पुढील काळात सतत कार्य करण्यास इच्छुक असलेले भूमीपुत्र  उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिला भगिनींनी त्यादिवशी असणारी वटपौर्णिमा व्रत हे आपल्या पित्याच्या नामाकरणासाठी सिडको भवनाजवळच साजरी करणार असा निर्णय घेतला व तो गावो गावी महिलांना पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले. त्याचप्रमाणे उपस्थित ग्राम समन्वयकांस सोबत घेऊन २४ तारखेच्या घेराव आंदोलनासाठी अधिक प्रसार व जागृती व्हावी याकरिता गावोगावी ग्रामस्थांसोबत बैठका होणार आहेत.

 यावेळी नवी मुंबई मुख्य समन्वयक मनोहर पाटील, डॉ. राजेश पाटील, दशरथ भगत, दिपक  ह. पाटील, माजी नगरसेवक रामचंद्र घरत, घनश्याम मढवी, विनोद विनायक म्हात्रे, गिरीश म्हात्रे, निलेश पाटील, मनोज मेहेर, विजय पाटील, चेतन पाटील,  शिवचंद्र पाटील, शैलेश घाग, सुनील पाटील, राजेश मढवी, संदिप पाटील, सविनय म्हात्रे, ऍड शिल्पा पाटील, संतोष सुतार, दिगंबर पाटील, सुरेश वास्कर व २९ गावांतील ग्राम समन्वयक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

आमदार सौ.मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून देण्यात आलेल्या २ रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उत्साहात

Next Post

रस्त्यावर साचणारे पाणी, पदपथावरील मातीचे ढिगारे हटवा : महादेव पवार

Next Post
रस्त्यावर साचणारे पाणी, पदपथावरील मातीचे ढिगारे हटवा : महादेव पवार

रस्त्यावर साचणारे पाणी, पदपथावरील मातीचे ढिगारे हटवा : महादेव पवार

गाढेश्वर धरण, कुंडी धबधबा, वारदोली धबधब्यावर जाण्यास बंदी

गाढेश्वर धरण, कुंडी धबधबा, वारदोली धबधब्यावर जाण्यास बंदी

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

नवी मुंबईत आज कोरोनाचे १३५ रूग्ण, ७ मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com