• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 25, 2021

विमानतळाच्या आवारात अंतुलेंससह दि. बा. पाटील यांचे स्मारक (पुतळा) उभारण्याची एमआयएमची मागणी

adminbyadmin
in Uncategorized
0
विमानतळाच्या आवारात अंतुलेंससह दि. बा. पाटील यांचे स्मारक (पुतळा) उभारण्याची एमआयएमची मागणी

Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या आवारात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व लोकनेते बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले आणि प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये लोकनेते दि. बा. पाटील यांचे स्मारक (पुतळा) उभारण्याची मागणी एमआयएम महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी आघाडीचे महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

मुंबईतील विमानतळावर वाढत असलेला ताण व त्यामुळे आकाशात होणारी वाहतुक कोंडी यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने रायगड जिल्ह्यात नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू केलेले आहे. रायगडमधील जनतेलाच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच जनतेला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व लोकनेते बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले आणि प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये लोकनेते दि. बा. पाटील या रायगडच्या सुपुत्रांचे नाव व कार्य परिचित आहे. या सुपुत्रांनी रायगडच्या भुमीत जन्म घेतला, ही आमची फार मोठी पुण्याई आम्ही समजतो व त्यांच्याच आदर्शावर वाटचाल करत जनसेवेचे कार्य आज  करत असल्याची हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.

लोकनेते बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. लंडनहून भवानी मातेची तलवार परत आणण्यासाठी त्यांनी दिलेले व केलेले कार्य महाराष्ट्राच्या भूमीवर कोणताही महाराष्ट्रीयन माणूस विसरू शकत नाही. याशिवाय लोकनेते दि. बा.पाटील यांच्यामुळे नवी मुंबईतील ग्रामस्थांचे, प्रकल्पग्रस्तांचे आज अस्तित्व दिसत आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. दि.बा.पाटील यांच्यामुळे साडेबारा टक्के योजनेतून ग्रामस्थांना, प्रकल्पग्रस्तांना भुखंड मिळाले, त्यातून त्यांना निवासी व  वाणिज्यिक सुविधा मिळाली व प्रगती साधता आली. दि. बा. पाटील यांनी खासदार व आमदार म्हणून केलेले कार्य जनहितैषी व प्रेरणादायी आहे. रायगडच्या जमिनीवर उभ्या राहत असलेल्या विमानतळाच्या आवारात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व लोकनेते बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले आणि प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये लोकनेते दि. बा. पाटील यांचे स्मारक (पुतळे) राज्य सरकारने उभारणे आवश्यक आहे व त्याखाली यांच्या कार्याचाही आढावा शिलालेखावर कोरण्यात यावा. जेणेकरून विमानतळावर येणाऱ्या प्रत्येकाला रायगडच्या या सुपुत्रांचे कार्य समजेल आणि त्यापासून त्यांनाही प्रेरणा घेता येईल. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व लोकनेते बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले आणि प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये लोकनेते दि. बा. पाटील ही केवळ नावे नाहीत तर आम्हा रायगडवासियांचा श्वास आहे, प्रेरणास्थान व श्रध्दास्थान आहे. आमच्या भावना व भावनिक अस्मिता लक्षात घेवून राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळाच्या आवारात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व लोकनेते बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले आणि प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये लोकनेते दि. बा. पाटील यांचे स्मारक (पुतळा) बसविण्यात येणार असल्याचा निर्णय जाहिर करावा  सरकारने हा निर्णय न घेतल्यास रायगड व ठाण्यातील जनता या विमानतळाचा कोणालाही वापर करू देणार नाही तसेच या विमानतळावरून एकही विमान उडू देणार नाही याचीही आपण जाणिव ठेवावी. आपण आमच्या मागणीमागील कळकळ पाहता लवकरात लवकर स्मारकाबाबतचा निर्णय जाहिर कराल असा आशावाद हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनाच्या अखेरीस व्यक्त केला आहे.

Previous Post

दिबांच्या नावासाठी स्वातंत्र्यदिनाच्या डेडलाईन; अन्यथा विमानतळाचे सर्व कामे बंद पाडणार

Next Post

कर्ज फेडण्यासाठी चालक-मालकांना डिसेंबरपर्यत मुदतवाढ द्या : दिलीप आमले

Next Post
कर्ज फेडण्यासाठी चालक-मालकांना डिसेंबरपर्यत मुदतवाढ द्या : दिलीप आमले

कर्ज फेडण्यासाठी चालक-मालकांना डिसेंबरपर्यत मुदतवाढ द्या : दिलीप आमले

गृहमंत्री वळसेपाटील यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा

ओबीसीच्या आरक्षणासाठी नेरूळला कॉग्रेसचे आंदोलन

ओबीसीच्या आरक्षणासाठी नेरूळला कॉग्रेसचे आंदोलन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com