• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 29, 2021

महापालिका मुख्यालयाचे ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय असे नामकरण करावे : आ : सौ.मंदा म्हात्रे

adminbyadmin
in Uncategorized
0
महापालिका मुख्यालयाचे ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय असे नामकरण करावे : आ : सौ.मंदा म्हात्रे

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई:- सीबीडी बेलापूर पामबीच मार्गालगत असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाचे ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा प्रधान सचिव यांजकडे केली. राज्यातील अनेक नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद यांच्या मुख्यालयाच्या नामकरणाचे ठराव राज्य शासनाकडे प्रलंबित असून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या नामकरणाचा ठराव गेलेला नसल्याने ही मागणी करण्यात आली असल्याचे आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नवी मुंबईतील धर्मवीर संभाजी महाराज घाऊक भाजीपाला महासंघ, छत्रपती संभाजी महाराज उत्सव मंडळ, धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान अशा विविध सामाजिक संघटनांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे मागणी केली होती. यावेळी एपीएमसीचे संचालक शंकर पिंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे (माऊली), डॉ.राजेश पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, गणेश पावगे उपस्थित होते.

     यावेळी आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द तेजोमय होती.छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती जनसामान्यांच्या रुजू व्हावी, याकरिता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या या वास्तूला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्याकरिता अनेक संस्था, संघटना तसेच शिवप्रेमी, शंभुप्रेमींची मागणी होती. या लोकभावनेतून ही मागणी करण्यात आली असून राज्यातील अनेक नगरपालिका, महानगरपालिका मुख्यालयांना नामकरण देण्याबाबतचा ठराव राज्य शासनाकडे गेलेले असून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या नामकरण बाबतचा ठराव अजून गेलेला नाही. एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून ही मागणी केली असल्याचे आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

Previous Post

फी न भरू शकणाऱ्या मुलीच्या शिक्षणाची एमआयएम विद्यार्थी आघाडीने स्विकारली जबाबदारी

Next Post

नरेंद्र मोदी व भाजपने बंजारा समाजाची फसवणूक केली : नाना पटोले

Next Post
नरेंद्र मोदी व भाजपने बंजारा समाजाची फसवणूक केली : नाना पटोले

नरेंद्र मोदी व भाजपने बंजारा समाजाची फसवणूक केली : नाना पटोले

सावरकरांच्या पुतळ्याच्या बेटाचे सुशोभीकरण करून उंची वाढवण्याची मागणी

सावरकरांच्या पुतळ्याच्या बेटाचे सुशोभीकरण करून उंची वाढवण्याची मागणी

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

नवी मुंबईत आज कोरोनाचे १०२ रूग्ण, १ मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com