• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 7, 2021

काँग्रेस पक्ष माथाडी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल : नाना पटोले

adminbyadmin
in Uncategorized
0
काँग्रेस पक्ष माथाडी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल : नाना पटोले

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com

प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या उपस्थितीत माथाडी कामगारांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

मुंबई :  केंद्रातील मोदी सरकारने नवीन कायदे करून शेतकरी, कष्टकरी, कामगारांना देशोधडीला लावण्याचे पाप केले असून कामगारांना भांडलदारांच्या दावणीला बांधण्याचे काम केले आहे. कामगार हा महत्वाचा घटक असून त्यांचा सन्मान झालाच पाहिजे. काँग्रेस पक्ष नेहमीच कष्टकरी, कामगार वर्गाच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे आणि भविष्यातही कामगारांच्या हितासाठी उभा राहिल अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

टिळक भवन येथे आज माथाडी कामगार नेते राजन म्हात्रे, छगन पाटील यांच्या नेतृत्वात असंख्य माथाडी कामगारांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, उपाध्यक्ष भाई नगराळे, किसान काँग्रेसचे शाम पांडे, बद्रुद्दीन जमा, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, कामगार, शेतकरी ही देशाची खरी ताकद आहे हे पंडित नेहरुंनी ओळखले होते. त्यांच्या ताकदीवरच स्वातंत्र्यानंतर देशाला एक सक्षम, बलशाली राष्ट्र म्हणून उभे केले. कामगारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाने अनेक कायदे केले आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. परंतु केंद्रातील भाजपा सरकारने या कामगारांच्या अस्तित्वावरच घाला घातला आहे. काँग्रेस पक्ष माथाडी कामगारांच्या अधिकारांसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल, त्यांना न्याय देईल, आपले प्रश्न सरकार दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास पटोले यांनी यावेळी दिला आणि काँग्रेस प्रणित माथाडी कामगार संघटना सर्वात मोठी संघटना करा असे आवाहन केले.

टिळक भवन येथील कार्यक्रमात लोकनेते नानाभाऊ पटोले सोशल फोरम काँग्रेस पक्षात समाविष्ठ करण्यात आला. कष्टकरी शेतकरी संघटना, श्रमीक मुक्ती आंदोलन व महाराष्ट्र आदिवासी मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर भाजपाच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रोहिदास दत्तु चव्हाण शिवसेना प्रणित न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Previous Post

आज कोरोनाचे १५० रूग्ण, ४ मृत्यू

Next Post

गणेशोत्सवाच्या शिवसेना चोरी-चोरी छुपके-छुपके बैठका का घेतेय : आ. आशिष शेलार

Next Post
एक लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत, अकरावी प्रवेशांमधील घोळ आवरा

गणेशोत्सवाच्या शिवसेना चोरी-चोरी छुपके-छुपके बैठका का घेतेय : आ. आशिष शेलार

डब्बे बदलून उपयोग नाही, देशाला खड्यात घालणारे इंजिनच बदलण्याची वेळ : नाना पटोले

डब्बे बदलून उपयोग नाही, देशाला खड्यात घालणारे इंजिनच बदलण्याची वेळ : नाना पटोले

सिडकोच्या पोकलेनसमोर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला ठिय्या

सिडकोच्या पोकलेनसमोर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला ठिय्या

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com