Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmailcom
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांची आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६ ए मधील महापालिका शाळा क्रं ९ कै. वत्सलाबाई रामा भगत शाळेच्या मैदानाच्या सुशोभीकरणाची लेखी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर १६ ए मधील महापालिका शाळा क्रं ९ कै. वत्सलाबाई रामा भगत शाळेच्या मैदानाची आपण पाहणी केल्यास आपणास त्या मैदानाच्या दुरावस्थेविषयी व बकालपणाविषयी कल्पना येईल. या मैदानावर जंगली गवत पावसामुळे वाढले असून मैदानावर दगडी व अन्य साहीत्य विखुरलेले पहावयास मिळेल. ही शाळा मनपा प्रशासनदरबारी पुरस्कारप्राप्त शाळा आहे. शाळेच्या मैदानावर असलेला बकालपणा महापालिका प्रशासनास भूषणावह नाही. या मैदानावरील जंगली गवत, विखुरलेला कचरा, ढिगारे, दगडी हटवून तेथे स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे आहे. या मैदानावरील समस्या हटवून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.