संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : जात प्रमाणपत्र धारकांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे अर्ज, त्यासोबत सादर करावयाची कागदपत्रांची माहिती व मार्गदर्शन यासाठी २८ जुलै, २०२१ रोजी दुपारी २ वाजता झुम (Zoom) ॲपवर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणे यांनी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जाती प्रवर्गातील यापैकी कोणत्याही जातीच्या व्यक्तीसाठीएक तर कोणत्याही सरकारी नोकरीमधील किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशासाठी तरतूद केलेल्या कोणत्याही आरक्षणाचा लाभ मिळावायाकरिता किंवा भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १५, खंड (४) अन्वये केलेल्या कोणत्याही विशेष तरतूदीखालील कोणताही अन्य लाभ मिळण्याकरीता किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणातील किंवा सरकारी संस्थांमधील निर्वाचित पदे लढविण्याच्या प्रयोजनाकरीता किंवा शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अन्य प्रयोजनाकरीता अशा लाभाची मागणी करतांना, जिने जाती प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते, अशा जाती प्रवर्गातील व्यक्ती जाती प्रमाणपत्रधारक व्यक्तीस जात प्रमाणपत्राची पडताळणी करून जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र धारकांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे अर्ज, त्यासोबत सादर करावयाची कागदपत्रांची माहिती व मार्गदर्शन यासाठी २८ जुलै, २०२१ रोजी दुपारी २ वाजता झुम (Zoom) ॲपवर वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी CVC Thane is inviting you to a scheduled Zoom meeting. Topic: Castevaliditywebinar Time: Jully 28 2021 02:00PMIndia Join Zoom Meeting
https:// us05web.zoom.us/j/84059515081?pwd=bXZXaGovMUNLQoxUMoRUWkU1BzIKUT09
या लिंकचा वापर करावा. तसेच Meeting ID: 84059515081 व Passcode: 5vdc2 चा वापर करण्यात यावा.
इच्छुक महाविद्यालयीन प्राचार्य, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी या वेबीनारमध्ये मोठया संख्येने सहभाग घेऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.