नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग 87 मध्ये घरटी आरोग्य अभियान राबवून लोकांना आजाराबाबत मार्गदर्शन करण्याची लेखी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक व विभागप्रमुख रतन नामदेव मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ नोडमधील प्रभाग 87 मध्ये नेरूळ सेक्टर 8 पूर्ण आणि नेरूळ सेक्टर 10 मधील काही गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश होत आहे. परिसरात आजही तापाचे व डेंग्यूचे, मलेरियाचे रूग्ण आढळून येत आहेत. हे रूग्ण खासगी दवाखाने व रूग्णालयात उपचार घेत असल्याने महापालिका प्रशासनाला आजारांची कल्पना येत नाही. कोरोना महामारीमध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक झाल्यास परिस्थिती हाताळणे कठीण होइरल. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रभाग 87 मध्ये घरटी आरोग्य अभियान राबवून आजारांची कल्पना घ्यावी. आजार झाल्यावर तसेच आजार होवू नये म्हणून घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्याची मागणी रतन मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.