स्वयंम वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : मच्छिमार घटकासाठी सातत्याने प्रशासकीय पातळीवर अगदी केंद्रापासून ते राज्य सरकारपर्यत पाठपुरावा करणारे संजय पवार यांचा राजस्थानातील उदयपूर या ठिकाणी त्यांच्या उल्लेखनीय कार्याबाबत सत्कार करण्यात आला.
मरीन हे जहाज सीम्परस (टर्की) या ठिकाणी काही महिन्यांपासून अडकले होते व त्या सोबत तिथे असणारा भारतीय सिफेरर्स चा एक गट देखील तेथे अडकला होता. त्या ठिकाणी अडकलेल्या घटकांच्या घरच्यांनी ऑल इंडिया सिफेरर्स युनियन अध्यक्ष संजय पवार कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांच्याकडे मदत मागितलीवर त्यांना संजय पवार व सहकाऱ्यांकडून तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात आली. त्यांना भारतात मायदेशी आणले. संजय पवार यांच्या कार्याची दखल घेत सिफेरर्सच्या कुटूंबियांनी राजस्थानातील उदयपुर या ठिकाणी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार केला. या वेळी उदयपूरचे भाजप खासदार अर्जूनसिह मिनाजी यांचेकडून संजय पवार यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले व पवार यांचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यत पोहोचविण्याचे आश्वासनही खासदार मिनाजी यांनी यावेळी दिले.