स्वाती इंगवले : (९८२००९६५७३ केवळ व्हॉटसअप)
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून डिजिटल भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमला शासनाच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष सध्या साजरा केला जात असताना याच धर्तीवर राज्याच्या आर्थिक उभारणीतील शेतकऱ्यांचे योगदान विचारून घेऊन या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यात देखील तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत ई-महाभूमी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या आज्ञावली मधून संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या अधिकार अभिलेख विषयक अद्ययावत सातबारा उताराच्या प्रती प्रत्येक गावात जाऊन तलाठी मार्फत ते घरोघरी वाटप केले जाणार आहेत. पनवेल तालुक्यात या मोहिमेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी शेकडो शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा दाखले वितरीत करण्यात आले आहेत. तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनानुसार या मोहिमेला यशस्वीपणे सुरुवात झाली आहे.