स्वाती इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ मध्ये नवरात्र उत्सव २०२१ या निमित्ताने प्रभागातील रहीवाशांसाठी भाजपाचे युवा नेते पांडूरंग आमले यांच्या नेतृत्वाखाली साईभक्त सेवा मंडळ व साईभक्त महिला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने प्रभाग ७६ मध्ये पैठणीचा खेळ रंगणार आहे. या सर्वच स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याची माहिती समाजसेविका सौ. शारदा पांडूरंग आमले यांनी दिली.
भाजपाचे युवा नेते पांडूरंग आमले यांच्या नेतृत्वाखाली साईभक्त सेवा मंडळ व साईभक्त महिला फाऊंडेशनच्या वतीने नवरात्र उत्सवातील नऊ दिवसात महिला भगिनींमध्ये उत्साह वाढविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी गुरूवार, दि. ७ ऑक्टोबरला ‘पिवळ्या साडीवर सेल्फी’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही सेल्फी पांडूरंग आमले यांच्या जनसंपर्क कार्यालयात येवून काढणे स्पर्धकांसाठी आवश्यक होते. काढलेली सेल्फी ८६९३८२५६७७, ९३२६२५२५१२, ९५९४९२७३७४, ८९७६६४६१९१ या भ्रमणध्वनीवर नाव व पत्ता असा उल्लेख करून पाठविणे व पांडूरंग आमले यांच्या फेसबुकवर टॅग करण्याची अट आयोजकांकडून ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत स्थानिक महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेसाठी १ले बक्षीस – पैठणी, २ रे बक्षीस – ड्रेस पीस, ३ रे बक्षीस – आकर्षक वस्तू ठेवण्यात आले आहे.
विभागातील महिला बचत गटासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून नऊ दिवसात त्या बचत गटाच्या महिलांनी ग्रुपने कला सादर करायची आहे. यामध्ये सेल्फी विथ १५ सदस्य, ग्रुप फोटो, ग्रुप गरबा, ग्रुप दांडिया, ग्रुप वेशभूषा ,ग्रुप देखावा सादरीकरण बचत गट ग्रुपला कोणतीही संकल्पना सुचेल ते सादरीकरण करावे यातून २ बक्षीस जाहीर करणार असल्याची माहिती समाजसेविका सौ. शारदा पांडूरंग आमले यांनी दिली. या स्पर्धेसाठी १ ले बक्षीस ५००१, २ रे बक्षीस ३००१ ठेवण्यात आले आहे.
जॅकपॉट धमाका स्पर्धेमध्ये जे जे स्पर्धक वरील स्पर्धेत (नऊ दिवस) भाग घेतील त्यांनाच या जॅकपॉट स्पर्धेत भाग घेता येईल, लकी ड्रॉ पद्धतीने निकाल १४ ऑक्टोबर २०२१ रोजी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते काढून दिला जाईल आणि दररोजच्या स्पर्धेची माहिती आदल्या दिवशी दिली जाईल, दररोज स्पर्धेचा निकाल जाहिर होईल, वेळ सकाळी ९ ते रात्री ८ पर्यत असेल अशी या स्पर्धेबाबतची विस्तृत माहिती समाजसेविका सौ. शारदा पांडूरंग आमले यांनी दिली.