स्वाती इंगवले : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवॅी मुंबई : कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या प्रशासनदरबारी प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यासाठी गेल्या काही वर्षात सातत्याने करणाऱ्या महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन पालिका मुख्यालयात करण्यात आले. ही कामगार संघटना इंटकशी संलग्न असून कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
महापालिका कामगार व अधिकारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने महापालिका ते मंत्रालय पाठपुरावा करत असल्यामुळे महाराष्ट्र कर्मचारी युनियन नावारूपाला आलेली आहे. कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही कामगार संघटना कार्य करत आहे. या नामफलकाच्या उद्घाटनाच्या वेळी राजन सुतार, वाहन चालक युनिटचे अध्यक्ष कृष्णा घनवट तसेच वाहन विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.