संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : ९९६७७७१७८०
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून मंगळवारी ऐरोली, कोपरखैणे, घणसोली व विभागात विविध संवर्गात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ देवून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे यांनी ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे या विभागामध्ये सर्व साफ-सफाई कंत्राटदार, पर्यवेक्षक, कचरा वाहतूक कंत्राटदार प्रतिनिधी / पर्यवेक्षक, सार्वजनिक शौचालय कंत्राटदार/ पर्यवेक्षक यांची ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’च्या अनुषंगाने मिटिंग घेण्यात आली. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना दैनंदिन साफ सफाई व कचरा वाहतूक याबाबत सूचना दिल्या आणि स्वच्छता शपथ घेऊन स्वच्छतेचे महत्त्व सांगितले सदर प्रसंगी विभागातील स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, उपस्वछता निरीक्षक उपस्थित होते.