संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : जुईनगरमधील नागरी समस्या सोडविण्यासाठी समाजसेवक विजय साळे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेवून त्यांनी समस्यांचा पाढाच वाचला. सततच्या समस्यांमुळे जुईनगरचे रहीवाशी त्रस्त झाले असून करदात्या जुईनगरवासियांना सुविधा मिळविण्याचा हक्कच नाही का, असे विजय साळे यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. लवकरात लवकर जुईनगरवासियांच्या समस्या सोडवून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
जुईनगरमधील नागरिकांच्या समस्यांबाबत समाजसेवक विजय साळे यांनी काही गृहनिर्माण सोसायटींमध्ये कमी दाबाने पाणी येत आहे. परिसरातील मल:निस्सारण वाहिन्या चोकअप होत आहे. डासांचा त्रास व त्यातून निर्माण होणारे साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी जुईनगरमध्ये सातत्याने धूर फवारणी नियमित करावी, निकुष्ठ दर्जाचे रस्ते व बेजबाबदार कंत्राटदार यांच्यावर कारवाई करावी, जुईनगरमधील नागरिकांना कायमस्वरूपी स्टेशनला ये-जा करण्यासाठी चांगला रस्ता महापालिकेने तयार करून द्यावा, फेरीवाल्यांना कायमस्वरूपी जागा द्यावी यासह शाळेच्या संदर्भात काही समस्या निवेदनातून आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. स्थानिक रहीवाशी नागरी समस्यांबाबत आमच्याकडे तक्रारी करत असल्याने पालिका प्रशासन व स्थानिक रहीवाशी यांच्यातील दुवा म्हणून आपणाकडे समस्या सोडविण्याची मागणी करत असल्याचे विजय साळे यांनी या बैठकीत सांगितले.