संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्यानंतर कॉंग्रेस पक्षामध्ये ‘आलबेल’ नसल्याचे काही वेळातच स्पष्ट झाले. नाना पटोळेंनी आपल्या माणसांवर कृप्पादृष्टी दाखविताना जुन्या जाणत्या व अनुभवी तसेच भाजपा-सेना सत्तेवर असताना सतत मोदी व भाजपावर टीका करणाऱ्या सचिन सावंतांसारख्या मातब्बराला डावलण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कॉंग्रेस ही नानाशाहीची कॉंग्र्रेस झाली असल्याचा आरोप आता कॉंग्र्रेसच्या जुन्या जाणत्यांकडून करण्यात येवू लागला आहे. सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याने कॉंग्रेसची धार प्रसिध्दी माध्यमांमध्ये बोथट झाली असल्याचे खुद्द भाजपामधील अनेक रथी-महारथींकडून ‘ऑफ द रेकॉर्ड’ सांगण्यात येवू लागले आहे.
या नियुक्त्यांवर नाराज होऊन काँग्रेस अध्यक्ष सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. अतुल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद दिल्याने सचिन सावंत यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितलं.
सचिन सावंत हे गेल्या दहा वर्षापासून काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. मधल्या काळात त्यांना विधानपरिषदेवरही पाठवणार असल्याची चर्चा होती. सावंत यांनी सातत्याने भाजपला अंगावर घेतले होते. भाजपावर व मोदी आणि भाजपाच्या घटकांना प्रसिध्दी माध्यमांतून झोडपण्याचे काम केवळ सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदावरून केले होते. काँग्रेसची नेमकी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आणि भाजपला सडेतोड उत्तर देण्याचे कामही ते करत होते. शिवाय पक्ष चर्चेत ठेवण्याचेही काम त्यांनी केले होते. मात्र, आज झालेल्या नियुक्त्यांमध्ये त्यांना डावलून अतूल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद देण्यात आलं. त्यामुळे सावंत नाराज झाले असून या नाराजीतूनच त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. सावंत यांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस हायकमांडला पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले. सचिन सावंतासारख्या अनुभवी आणि कॉंग्रेसच्या निष्ठावंतांला डावलून मुख्य प्रवक्तेपदी लोंढेंना बसविल्याने नाना पटोळेंना संघटनात्मक पातळीवर कॉंग्रेस वाढवायची आहे का आपल्या माणसांना सांभाळायचे आहे, असा सवाल कॉंग्रेसच्या रथी-महारथींकडून आता विचारला जावू लागला आहे.