संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९९६७७७१७८०
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कोजागिरी उत्सव नेरूळ सेक्टर दोन मधील एलआयजी आवारातील घरकुल सोसायटीमधील कॉंग्रेस पक्ष कार्यालयासमोर लहान मुले, महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने साजरी झाली. कामगार नेते व नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर व कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कोजागिरीनिमित्त संगीत खुर्ची या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सौ. माधुरी कदम यांना पहिले, सौ. सुरेखा बांदेकर यांना दुसरे तर सौ. सविता जाधव यांना तिसरे बक्षिस मिळाले. लहान मुले व महिला या संगीत खुर्ची खेळात उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. मंगल बागडे, सौ. सारीक धोंडे , सुधीर पांचाळ, सौ. नीलिमा वाघमारे, सौ .मृणालिनी बागडे, सौ. विमल सोनावणे, सौ. सुरेखा बांदेकर, सौ. लता दांगट या सर्वांनी विशेष मेहनत घेतली.