महापालिका प्रतिनिधी : मनिष चव्हाण : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोव्हिड – १९ लसीचे दोन डोस म्हणजे संपूर्ण संरक्षण तेव्हा दुसरा डोस वेळेत घ्यायला विसरू नका! अशी सोशल मिडियावरून नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून बॅनरच्या माध्यमातून सोशल मिडियावर गुरूवारी जनजागृती करण्यात आली. तथापि कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी भाजपाचे नवी मुंबईतील युवा नेतृत्व व गणेश नाईकांचे कट्टर समर्थक असणाऱ्या सुरज पाटलांनी दोन डोस लसीकरणाचे नागरिकांनी लवकरात लवकर घ्यावे अशी जनजागृती सोशल मिडियावरून तसेच रहीवाशांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीतून यापूर्वीच सुरू केलेली आहे.
कोरोना काळात नवी मुंबईत अनेकांनी कोरोना योध्दा म्हणून उल्लेखनीय काम केलेले आहे. कोरोना रूग्णांना रूग्णालयीन प्रवेश, ऑक्सिजन, आयसीयूची उपलब्धतता, आर्सेनिक ३० अल्बमचे वितरण, मास्क वितरण, धान्य वितरण, जंतुनाशक फवारणी, अगदी दुर्दैवाने कोणी कोरोनाने दगावल्यास स्मशानभूमीतही मदत, संबंधितांच्या थेट घरी जावून सांत्न करणे यासह अन्य कार्यात सुरज पाटील सतत आघाडीवर राहीलेले आहे. कोरोना महामारी आटोक्यात येत असल्याचे पाहून लोकांनी मास्क लावण्याचे कमी केल्यावर मास्क पुन्हा लावण्याची रहीवाशांना हात जोडून विनंती करणे, सोशल मिडियावरून दोन डोस लसीकरणाचे घेण्याविषयी सोशल मिडियावरून सुरज पाटलांनी गेल्या काही दिवसांपासून कळकळीचे आवाहन करण्याचा प्रयत्न चालविला आहे.