सौ. सुवर्णा खांडगेपाटील : संपादक ८३६९९२४६४६
बातमीसाठी मेल आयडी : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ मधील महापालिकेच्या ‘सार्वजनिक उद्यान’ याचे तुटलेले प्रवेशद्वाराची तात्काळ दुरूस्ती करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर दोनमध्ये दत्तात्रेय सोसायटी, कॉंग्रेस मध्यवर्ती कार्यालयाशेजारी महापालिकेचे ‘सार्वजनिक उद्यान’ आहे. या उद्यानातील प्रवेशद्वार तुटलेले आहे. त्यामुळे या उद्यानाचा रात्रीच्या वेळी गर्दुले, मद्यपि यांच्याकडून गैरवापर होण्याची भीती आहे. याशिवाय रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी तुटलेल्या प्रवेशद्वाराचा फायदा घेत सांयकाळनंतर त्याचा लघुशंकेसाठीही वापर करण्याची शक्यता आहे. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी संबंधितांना तात्काळ या उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या दुरूस्तीचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.