संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील वरूणा सोसायटीलगत संरक्षक भिंतीलगतच्या पदपथावर पथदिवे उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडको वसाहतीमध्ये वरूणा सोसायटीलगत पदपथ आहे. या पदपथावरून नेरूळ सेक्टर सहाचे रहीवाशी तसेच सारसोळे गावातील ग्रामस्थ खाडीमध्ये मासेमारी करण्यासाठी ये-जा करत असतात, या पदपथाच्या एका बाजूला टॉवरचे काम सुरू आहे. त्यापुढे आल्यावर महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसाठी बसविलेला कंटेनर आहे तर दुसऱ्या बाजूला वरूणा सोसायटीची संरक्षक भिंत आहे. या ठिकाणी सांयकाळी ६ नंतर ते सकाळी ५.३० – सहा वाजेपर्यत अंधार असतो. एका बाजूला संरक्षक भिंत तर दुसऱ्या बाजूला टॉवरचे पत्रे, सफाई कामगारांसाठीचा कंटेनर यामुळे त्या ठिकाणाहून ये-जा करताना महिलांना, मुलींना तसेच ज्येष्ठ नागरिकांना भीती वाटते. या ठिकाणी महिलांची, मुलींची छेडछाड अथवा लुटमार, वाटमारी होण्याची भीती आहे. आपण पदपथाच्या कोपऱ्यावर दोन ते तीन ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था करून स्थानिक जनतेला अथवा सारसोळेच्या ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी महादेव पवारच यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
०००००००००००००००००० ००००००००००००००००
नवी मुंबई लाईव्हचे संपर्कासाठी कार्यालय :
संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील
कार्यालय : शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट क्रं ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (प.), नवी मुंबई