नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्त्री मुक्ती संघटना,आणि cost to cost eye care व महा ई सेवा केंन्द्र यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी २०२२ रोजी प्राप्ती निवास,सारसोळे गांव, सेक्टर ६, नेरुळ, या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा व ई – श्रम कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक ग्रामस्थांच्या व रहीवाशांच्या प्रतिसादाने हे शिबिर उत्साहात पार पडले.
सदर शिबीराचे उद्घाटन करताना शिवसेना उपशहरप्रमुख गणपत शेलार, शिवसेना उपविभागप्रमुख प्रल्हाद नारायण पाटील, शिवसेनेच्या रणरागिनी तसेच अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार व स्वंयरोजगार उपलब्ध करून देणाऱ्या शिवसेनेच्या महिला उपशहर संघठक सौ. समुद्राताई पाटील, शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार, ज्येष्ठ शिवसैनिक शरद गोडवे, युवा सेनेचे विभाग अधिकारी अजित खताळ व प्रभागातील शिवसेना, युवा सेना व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि समस्त शिवसैनिक तसेच स्थानिक रहीवाशी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.