विठ्ठल ममताबादे
उरण : तिथीनुसार शिवजयंती उरण मध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या शिवजयंती निमित्त उरणमध्ये प्रथमच ‘मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण’तर्फे शिवकालीन पर्वातील प्रत्यक्ष लढाईत वापरण्यात आलेले शस्त्र व पेशवाई काळातील नाणी प्रत्येक नागरिकांना, शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांना जवळून पाहण्याची सुवर्णसंधी उरणमध्येच सोमवार, २१ मार्च २०२२ रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत तेरापंथी हॉल, वाणीआळी, उरण शहर येथे उपलब्ध होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या इतिहासाचे साक्षीदार व्हावेत, या सुवर्णसंधीचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण या संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल विजय पाटेकर यांनी सर्व उरणकरांना केले आहे.