नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील महापालिका जिजामाता उद्यानातील तुटलेल्या खेळण्यांची दुरूस्ती करण्यासाठी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनातून मागणी करताना कोरोनाची लाट ओसरली आहे, मुलांच्या परिक्षाही संपल्या आहेत. किमान लहान मुलांना खेळण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून तुटलेल्या खेळण्याची तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी समस्येचे गांभीर्य संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे साकडे महापालिका आयुक्तांना घातले आहे.
गेल्या काही महिन्यापासून नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या उद्यानाला बकालपणा प्राप्त झालेला आहे. या उद्यानातील झोपाळे, लहान मुलांचे खेळण्याचे बदक गेल्या काही महिन्यापासून तुटलेले आहेत. कदाचित येथील नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशी आणि सारसोळे गावचे ग्रामस्थ महापालिका प्रशासनदरबारी करदाते नसतील अथवा नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गाव परिसर महापालिका कार्यक्षेत्रातून वगळला असेल म्हणून महापालिका प्रशासन या उद्यानातील गेल्या अनेक महिन्यांपासून तुटलेल्या खेळण्याच्या डागडूजीकडे पाहत नसेल. सध्या लहान मुलांच्या परिक्षा संपलेल्या आहेत आणि मुलांना खेळण्यासाठी झोपाळे नाहीत व खेळण्यांचे बदक तुटले आहेत. वारंवार आपणाकडे तक्रारी करूनही आपण ज्यांना समस्या निवारणासाठी तक्रारपत्र फॉरवर्ड करता तेही आपल्या फॉरवर्ड पत्रांची दखल घेत नाहीत. सध्या आपण प्रशासक आहात. उद्यानातील खेळणी दुरूस्त होत नाहीत व आपण फॉरवर्ड केलेल्या निवेदनांना संबंधित अधिकारी किंमत देत नाही. यामुळे उद्यानातील तुटलेल्या खेळण्यांच्या महिनोमहिने दुरावस्थेमुळे आपल्याला अधिकारी जुमानत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहेत. तुटलेल्या खेळण्यांकडे पाहून या नेरूळ सेक्टर सहाला व सारसोळे गावाला कोणी पालिका दरबारी वालीच राहीला नसल्याचे स्पष्ट होत आहे. उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. किमान लहान मुलांना खेळण्यासाठी तरी महापालिका प्रशासनाने या उद्यानातील खेळणी दुरूस्त करण्याचे संबंधितांना निर्देश देवून नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावच्या ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
**** **** ****
उद्यानातील तुटलेल्या खेळण्यांबाबत गेल्या काही महिन्यापासून महापालिका आयुक्तांकडे सातत्याने लेखी पाठपुरावा करत आहे. महापालिका आयुक्तांच्या कार्यालयातून खेळणी दुरुस्तीबाबतची निवेदने केवळ फॉरवर्ड केली जातात, कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील लहान मुलांना झोपाळा, बदक आदी खेळणी तुटलेल्या अवस्थेत असल्याने खेळता येत नाही. समस्येचे निवारण झाल्याशिवाय पाठपुरावा थांबणार नाही. आयुक्त अभिजित बांगरसाहेब, तुम्हाला स्थानिक जनतेचा व सारसोळे ग्रामस्थांचा एकच प्रश्न आहे की, आयुक्तसाहेब उद्यानातील खेळण्यांची दुरूस्ती होणार कधी?
- संदीप खांडगेपाटील
- समाजसेवक / ज्येष्ठ पत्रकार