बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
स्वयंम न्यूज ब्युरो
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिलेल्या विधानपरिषदेतील १ ०जागा रिक्त होत आहेत. त्यामध्ये राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांसह विधानपरिषदेतील १० आमदारांची मुदत येत्या ७ जुलै २०२२ रोजी संपत आहे. तर ठाणे स्थानिक प्राधिकरण संस्थामधून विधानपरिषदेवर गेलेले शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांची मुदत येत्या ८ जून रोजी संपत आहे. सध्याच्या महाविकास आघाडीच्या संख्याबळाचा विचार करता भाजपकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संख्याबळानुसार १० जागांपैकी सहा जागा या महाविकास आघाडीला तर चार जागा भाजपला मिळणार आहे. भाजपच्या वाट्याला येणाऱ्या चार जागांमध्ये ठाणे जिल्ह्यातील भाजपचे अभ्यासू युवा नेतृत्व आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीप नाईक यांना संधी मिळणार का, याचीच चर्चा ठाणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुरू झालेली आहे.
विद्यार्थी संघटना, महापालिकेत नगरसेवक, सलग तीन वर्षे स्थायी समिती सभापती, सलग दोन वेळा आमदार आणि दुसरी आमदारकीची टर्म तर मोदी लाटेलाही न जुमानता जनकल्याणातून जनाधार निर्माण केल्याने सिध्द झालेली होती. संदीप नाईक विधान भवनात नसल्याने भाजपची जितकी हानी झालेली आहे, त्याहून कैकपटीने नवी मुंबई शहराची हानी झाली असल्याचे ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात उघडपणे बोलले जात आहे.
स्थायी समितीमध्ये सभापती म्हणून कार्यालयात न बसून राहता ‘सभापती आपल्या अंगणात’ हे अभियान राबवून प्रभागाप्रभागात पायी फिरून पालिकेच्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग होत आहे अथवा नाही याची त्या ठिकाणी जावून पाहण्याचे काम संदीप नाईकांनी केले आहे. गटारे, नाले तुडवत, खाणीचा, डोंगराचा परिसर फिरून काढत, चाळी-झोपडपट्ट्यांमध्ये जावून विकासकामांची पाहणी याच कालावधीत संदीप नाईकांनी केलेली होती. नवी मुंबईत अधिकाधिक पायपीट करून सर्वाधिक परिसर सातत्याने पायाखालून काढणारे संदीप नाईक हे आजही नवी मुंबईतील एकमेव नेतृत्व आहे. मुसळधार पावसाची तमा न बाळगता वाशी सेक्टर १७ मधील नाल्यात गळ्याएवढ्या तुंबलेल्या नाल्यातील पाण्यात उतरून स्वत:च्या हाताने कचरा साफ करणारे संदीप नाईक नवी मुंबईकरांनी जवळुन पाहिले आहे. अनुभवले आहेत.
संदीप नाईक हे नवी मुंबईतील उच्च विद्याविभूषित नेतृत्व आहे. तळागाळातील जनतेशी नाळ जुळलेले व जमिनीवर पाय असलेले नेतृत्व विधान भवनात नसल्याची फार मोठी किंमत नवी मुंबईला मोजावी लागली आहे. संदीप नाईक हे एक जनसेवेचे मिशन आहे. ध्येयाची दूरदृष्टी आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले म्हणून संदीप नाईकांची एक वेगळी ओळख आहे.
कोरोना काळात नवी मुंबईकरांची सर्वाधिक सेवा खऱ्या अर्थांने केवळ संदीप नाईकांनीच केलेली आहे. पाठीवर सॅनिटाईसचे मशिन घेवून आणि ४०-५० लोकांना मास्क वाटून सोशल मिडियावर चमकेशगिरी करणारे कोरोनाच्या काळात नवी मुंबईकरांनी शेकडोच्या नव्हे हजारोंच्या संख्येने नवी मुंबईकरांनी अनुभवले आहेत. व्हॉटसअप, फेसबुक आदी सोशल मिडियावर पाहिले आहेत. कोरोना काळात नवी मुंबईकरांसाठी जे कॉक्रीट स्वरूपात काम करावयास हवे होते, ते केवळ संदीप नाईकांनीच केले असल्याचे आजही भाजपविरोधातील मंडळी खासगीत बोलताना संदीप नाईकांच्या कार्याची प्रशंसा करत आहेत.
कोरोनाची आकडेवारी, औषधोपचार, मास्क, धान्य वाटप, परराज्यातील बांधवांना प्रवासासाठी सहकार्य, कोरोनाग्रस्तांना मदत, इंजेक्शन, लसीकरणाचा साठा यासह अन्य शेकडो कामे करून, कोरोना महामारीच्या काळात दिवसातले २० ते २१ तास जागून शहरातील कोरोना महामारीची प्रभागाप्रभागातील माहिती जाणून घेणारे संदिप नाईक हे नवी मुंबईनेच नाही तर ठाणे जिल्ह्याने जवळुन पाहिले आहे. जनसामान्यांसाठी भरीव कार्य करूनही स्वत:चा एकही फोटो कोठे येणार नाही, प्रसिध्दी मिळणार नाही याची जाणिवपूर्वक काळजी घेणारे संदीप नाईक आज त्यांच्या कार्यामुळेच नवी मुंबईकरांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका आता जेमतेम पाच-सहा महिन्यावर येवून ठेपल्या आहेत. संदीप नाईकांच्या कल्पक नियोजन व कुशल रणनीतीद्वारे भाजपला महापालिकेत सत्ता काबीज करायची. संदीप नाईकांच्या कार्याची भाजपा दखल घेवून त्यांना जुन महिन्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणूकीत भाजप संदीप नाईकांना संधी देणार का, याचीच ठाण्याच्या राजकारणात चर्चा जोर धरू लागली आहे.