• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 24, 2022

थकबाकी भरण्यात स्वारस्य न दाखविणाऱ्या मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
कंत्राटी कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत बोनस व ऑक्टोबरचे वेतन अदा करण्याचे आयुक्तांचे निर्देश

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताकर थकबाकीदारांना कोव्हीड कालावधीतील अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देण्याच्या दृष्टीने १ ऑक्टोबर २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अभय योजना लागू करण्यात आलेली होती. सदर अभय योजना पुन्हा लागू करावी अशी विनंती विविध स्तरांतून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचेकडे प्राप्त झाल्यानुसार १५ ते ३१ मार्चपर्यंत विशेष अभय योजना जाहीर करण्यात आलेली आहे.

या विशेष अभय योजने अंतर्गत थकबाकीदार नागरिक / व्यावसायिक यांनी आपल्या मालमत्ता कराची संपूर्ण थकित रक्कम अधिक दंडात्मक रक्कमेतील २५% दंडात्मक रक्कम भरल्यास त्यांना दंडात्मक रक्कमेवर ७५% इतक्या मोठ्या प्रमाणात सवलतीचा लाभ मिळत आहे. ही विशेष अभय योजना अंतिम असून त्यामध्ये कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही जाहीर करण्यात आलेली आहे.

तथापि काही मोठ्या मालमत्ताकर थकबाकीदारांकडून या सवलतीचा लाभ घेण्यासही फारशी उत्सुकता दिसून येत नाही. या अनुषंगाने मोठ्या रक्कमेची थकबाकी असलेल्या व विशेष अभय योजनेचा लाभ घेण्यात स्वारस्य न दाखविणाऱ्या थकबाकीदारांवर धडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.

तुर्भे येथील अक्षर डेव्हलपर्स, अक्षर बिझनेस पार्क, प्लॉट नं. ३, सेक्टर २५, तुर्भे येथील मालमत्तेचा २२ कोटी इतका मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकित असल्याने येथील २९९ मालमत्ता धारकांवर अंतिम मुदतीच्या दोन दिवसात करभरणा करण्याच्या नोटिसा बजाविण्यात आलेल्या आहेत. या कालावधीत थकित मालमत्ताकराचा भरणा न केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील प्रकरण ८, क्र. ४२ ते ४८ अन्वये मालमत्ता जप्तीची, बँक खाती गोठविण्याची तसेच नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. अशाच प्रकारची नियमानुसार कारवाई महानगरपालिका क्षेत्रातील इतरही थकबाकीदारांवरही करण्याचे प्रस्तावित आहे.

तरी मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांनी आपल्या मालमत्ताकरातूनच नवी मुंबई शहरातील विकास कामे होत असल्याचे लक्षात घेत जाहीर केलेल्या विशेष अभय योजनेच्या अंतिम सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि लगेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटला भेट देऊन ७५ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावरील सवलतीच्या दंडात्मक रक्कमेसह थकीत मालमत्ता कर भरणा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

 पीएफच्या कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारण न झाल्यास ठिय्या आंदोलन : रविंद्र सावंत

Next Post

सानपाडा सेक्टर ६, ७, ८ मधून जाणाऱ्या नाल्याची सफाई करा : पांडुरंग आमले

Next Post
एक दिवा राम मंदिरासाठी, एक दिवा प्रभू श्री रामासाठी, सानपाड्यात रविवारी दिपोत्सव

सानपाडा सेक्टर ६, ७, ८ मधून जाणाऱ्या नाल्याची सफाई करा : पांडुरंग आमले

देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल : नाना पटोले

भाजपची काळी जादू चालणार नाही; मविआ सरकार ५ वर्ष चालणार : नाना पटोले

रविंद्र सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिका मुख्यालयात लागल्या बायोमेट्रीक मशिन

रविंद्र सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिका मुख्यालयात लागल्या बायोमेट्रीक मशिन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com