अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापूर किल्ल्याच्या संवर्धनासाठी सिडको कडून राज्य पुरातत्व विभागाचे हस्तांतरण करण्याचा निर्णय राज्य सरकार घेत असताना नवी मुंबई महानगर पालिकेने सुरू केलेल्या बेलापुर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला ‘गोवर्धनी माता प्रवेशद्वार’ नाव देण्याचे काम सुरू केले आहे. येत्या काळात किल्ल्याचे होणारे सुशोभिकरण व संवर्धन हे नवी मुंबईच्या सौंदर्यात भर टाकणारे आहे. परंतु कर्नाटकीय शिल्पकलेतुन होणारी गोवर्धनी माता कमान की मंदिराच्या लगत करून तेथे रोषणाई वाढवावी व सदर ठिकाणी बेलापूर किल्ला प्रवेशद्वार नावाचीच कमान व्हावी. तरी गोवर्धनी माता मंदिर प्रवेशद्वार याच्या कामाचे कंत्राट रद्द न करता त्याची योग्य जागा निश्चित करावी व भविष्यात किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या कमानीच्या जागेसाठी येथे जागा राखीव ठेवावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन चव्हाण यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.