नवी मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नेरूळ ब्लॉक कॉग्रेसच्या वतीने नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य शिबिर व नेत्र चिकित्सा शिबिर उत्साहात पार पडले.
नेरूळ सेक्टर दोनमधील कॉंग्रेसच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात नेरूळ व जुईनगरमधील रहीवाशांसाठी कामगार नेते व नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यू मिलेनिअम हॉस्पिटलच्या सहकार्याने आरोग्य शिबिर तर रामक्रिष्णा नेत्रालयाच्या सहकार्याने नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कॉंग्र्रेस कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा उत्साहात पार पडला. त्यात वंदनाही घेण्यात आली. त्यानंतर कॉंग्रेस जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांच्यासमवेत कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नेरूळ व जुईनगरमधील वेगवेगळ्या विहारांना भेटी देत जयंती सोहळ्यात सहभाग नोंदविला. वेगवेगळ्या गृहनिर्माण सोसायटीतील आयोजित कार्यक्रमांना भेटी दिल्या.
नेरूळ सेक्टर १६ मधील जीवनज्योती आशालय या अनाथाश्रमाला भेट देवून येथील बालकांना पेन, पुस्तक या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्या भांडेकर यांच्यासमवेत राहूल कापडणे, सीमा वाघ, मारूती माने, कल्पना वाघमारे, पवित्रा सरडे, स्मृती पांचाळ, दिपक गावडे, कवलजित सोनावणे, स्वप्निल सोरटे, गौरव महापुरे व अन्य कॉंग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्ते कार्यक्रमात सहभागी झाले होते.