• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 19, 2022

३० वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतींचे संरचनात्मक परिक्षण करणेबाबत जाहीर आवाहन

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
कंत्राटी कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत बोनस व ऑक्टोबरचे वेतन अदा करण्याचे आयुक्तांचे निर्देश

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतीचे सन २०२१-२२ या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात ४७५ इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६४ पोटकलम (१) (२) (३) (४) अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६५ (अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरू होवून ३० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींची नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून संरचना परिक्षण करून घेणे अनिवार्य आहे.

३० वर्षापेक्षा जास्त काळ इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशत:) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजवयाचा आहे. नेमलेल्या संरचना अभियंत्याने शिफारशी केलेली दुरूस्तीची कामे पुर्ण झाल्याचे व ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महानगरपालिकेकडे सादर करावे. या प्रकारे संरचना परिक्षण करण्याचे उत्तरदायित्व जी संस्था / मालक / भोगवटादार पार पाडण्यास टाळा टाळ करतील त्यांना २५ हजार रूपये अथवा सदर मिळकतीचे वार्षिक मालमत्ताकराची रक्कम यातील जी जास्त असेल तितक्या रक्कमेचा दंड ठोठवावयाची तरतुद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३९८ (अ) खाली अंतर्भूत करण्यात आली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने संरचनात्मक परिक्षक (स्ट्रक्चरल इंजिनियर) यांची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in संकेतस्थळावर (website) उपलब्ध करून दिलेली आहे. ३० वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतीचे संरचनात्मक परिक्षण ३० सप्टेंबर २०२२ पूर्वी पूर्ण करून याबाबतचा अहवाल संबधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि सहाय्यक संचालक नगररचना, नवी मुंबई महानगरपालिका यांचेकडे सादर करावयाचा आहे.

      धोकादायक झालेल्या इमारतींचा / घरांचा वापर करणे जिकरीचे आहे. त्यामुळे जिवीत व वित्तहानी होऊ शकते म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा / घराचा रहिवास / वापर तात्काळ थांबविण्यात यावा असे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा दुर्दैवी अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधितांची राहीलयाची नोंद घेण्यात यावी, असे आवाहन नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

००००००००००००००० ००००००००००००००००० ०००००००००००००००००००

बातमीसाठी संपर्क : संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील

Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई लाईव्हचे कार्यालय : शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, भुखंड क्रमांक ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (पश्चिम), नवी मुंबई

Previous Post

मशिदीवरील अनधिकृत भोंग्यावर त्वरित कारवाई करा:  मनसेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Next Post

आयुक्तसाहेब, मुषक नियत्रंकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करा : संदीप खांडगेपाटील

Next Post
नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

आयुक्तसाहेब, मुषक नियत्रंकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करा : संदीप खांडगेपाटील

भारनियमनाविषयी खुलासा स्पष्ट करा : गणेश भगत

भारनियमनाविषयी खुलासा स्पष्ट करा : गणेश भगत

लोकोपयोगी उपक्रमांच्या सप्तहांनी होणार महादेव पवारांचा वाढदिवस साजरा

प्रभाग ८५ व ८६ मधील पथदिव्यांच्या समस्या निवारणासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पालिका आयुक्तांना साकडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com