विठ्ठल ममताबादे : Navimumbailive.com@gmail.com
उरण : अख्या देशभरात सध्या सर्वात जास्त तापलेला मुद्दा म्हणजे मशिदीवरील अनधिकृत भोंगे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी २ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घेतलेल्या सभेत अनधिकृत भोंग्यांबाबत मुद्दा उपस्थित काय केला आणि अख्या देशभरात त्या विषयी वादळ निर्माण झालं.महाराष्ट्रातही हा भोंग्यांचा विषय चांगलाच तापला आहे. त्याला अनुसरून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांबाबत मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संदेश ठाकूर म्हणाले की, माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मशिदीवरील व धार्मिक स्थळावरील भोंग्यावरती कारवाई होणे अपेक्षित होते, परंतु तशा स्वरूपाची कारवाई झालेली दिसत नाही.ध्वनिप्रदूषण कायदा हा सर्वांनाच लागू होतो. कोणताही धर्म हा कायद्यापेक्षा मोठा नाही. कोणत्याही धार्मिक स्थळांना नागरिकांच्या आरोग्याला त्रास देण्याचा अधिकार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. तरी सुद्धा नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीत अनेक मशिदीवर अनधिकृत भोंगे सुरु आहेत.अनधिकृत भोंग्यांबाबत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला असतानाही भोंगे का हटवले जात नाहीत ? येत्या ३ मे २०२२ पर्यंत मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा; नाहीतर ३ मे २०२२ नंतर हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील तो राबविण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा संघर्ष निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी ही सरकार आणि प्रशासनाची राहिल.असे संदेश ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महेश जाधव, रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश भाई ठाकूर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दळवी, पनवेलचे माजी तालुकाध्यक्ष पनवेल अविनाश पडवळ, रोजगार सेनेचे उपजिल्हा संघटक रितेश पाटील, वाहतुक सेनेचे जिल्हा संघटक अल्पेश कडू, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष विद्यार्थी सेना धनंजय भोरे, मनविसेचे तालुका अध्यक्ष गणेश तांडेल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
००००००००००००००० ००००००००००००००००० ०००००००००००००००००००
बातमीसाठी संपर्क : संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई लाईव्हचे कार्यालय : शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, भुखंड क्रमांक ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (पश्चिम), नवी मुंबई